कोकणातील पूरग्रस्तांसाठी ठाण्यातून जीवनावश्यक वस्तूंची रसद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:14+5:302021-07-26T04:36:14+5:30
ठाणे : अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून सावरण्यासाठी ...
ठाणे : अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून सावरण्यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेसने गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली या आपत्तीग्रस्त रहिवाशांना रविवारी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे पाच ट्रक माल रवाना केले आहेत.
कोकणातील या आपत्तीग्रस्त रहिवाशांसाठी पाठवलेल्या या पाच ट्रकना डाॅ. आव्हाड यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते. कोकणात काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नद्यांना आलेल्या पुराचा फटका बसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पाठवण्यासाठी डाॅ. आव्हाड यांच्यासह परांजपे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बिस्किटांचे एक लाख पुडे, बिस्लेरी पाण्याच्या एक लाख बाटल्या, फिनेलच्या चार हजार बाटल्या, ५० हजार मॅगीची पाकिटे, मेणबत्तीचे दोन हजार ५०० बाॅक्स, सहा हजार माचिसचे बाॅक्स आदी वस्तू व साहित्याचा पुरवठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पाठवला आहे. याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ८०० बाॅक्स पाणी, दोन हजार ५०० बिस्किटांची पाकिटे, १०० किलो फरसाण, ५० बाॅक्स फिनेल, एक हजार २०० झाडू आदी साहित्य या पाच ट्रकमध्ये भरून कोकणासाठी रविवारी पाठवले आहे.
.....
फोटो आहे