ठाणे-पालघरच्या १२८ शेतकरी वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:11 AM2018-05-04T02:11:26+5:302018-05-04T02:11:26+5:30
ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मदत देण्यात आली आहे. यामध्ये २०१४-१५ पर्यंत १०७ जणांना प्रत्येकी एक लाख तसेच २०१५-१६ मध्ये योजनेला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले. २०१६-१७ पर्यंत जिल्ह्यातील २१ शेतक ºयांना प्रत्येकी दोन लाखांची मदतवाटप केल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.
शेतात पाणी सोडण्यासाठी शेतकरी रात्रीच्यावेळी जात असतात. त्यावेळी अनेकदा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू अथवा गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकरी अपघात विमा योजना २००५-०६ पासून सुरू केली. त्यानंतर, २००९ पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना केले होते. दरम्यान, २००९-१० पासून ते २०१४-१५ या कालावधीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०७ शेतकºयांच्या अपघातांसंदर्भात विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच त्या वर्षीच्या योजनेनुसार त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत सुपूर्द केली आहे.
त्यानंतर, २०१५-१६ मध्ये या योजनेतील मदतही दुप्पट केली. अपघाती मृतांना मिळणारी मदत दोन लाख तर, जखमी होऊन एक अवयव निकामी झाल्यावर एक लाख किंवा दोन्ही अवयव निकामी झाल्यास दोन लाख अशी मदत देण्यास सुरु वात केली. त्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना लागू झाल्यानंतर २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांच्या वारसांना मदतीचे वाटप केले.