अंबरनाथमध्ये होणार म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:13+5:302021-07-03T04:25:13+5:30
अंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट सरते न सरते तोच राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनाशी दोन्ही ...
अंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट सरते न सरते तोच राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनाशी दोन्ही लाटांमध्ये दोन हात करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेने आता थेट म्युकरमायकोसिसवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी केली आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारी अंबरनाथ ही राज्यातली पहिलीच नगरपालिका ठरणार आहे.
अंबरनाथ शहरात नगरपालिकेने कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी ६०० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. डेंटल कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या याच कोविड सेंटरमध्ये आता म्युकरमायकोसिसची तपासणी करण्यासाठी एक विशेष केंद्र सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी म्युकरमायकोसिसवर शस्त्रक्रियाही केली जाणार आहे. या केंद्रात कान, नाक, घसा आणि डोळे तपासण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रे आणण्यात आली आहेत. शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या उपचारासाठी १५ खाटांचा स्वतंत्र विभागही पालिकेने याच कोविड सेंटरमध्ये उभारला आहे. म्युकरमायकोसिसच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा आणि पुढील उपचारांचा खर्च अंबरनाथ नगरपालिका करणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.
---------------------------------------------