'युद्ध कोरोनाशी' व्हाट्सएप स्पर्धेतून केली जनजागृती, स्पर्धांमध्ये सुरश्री, सागरराजे, असित, दादू यांनी मारली बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 03:05 PM2020-04-19T15:05:47+5:302020-04-19T15:30:27+5:30

विविध स्पर्धांमध्ये सुरश्री, सागरराजे, असित, दादू यांनी बाजी मारली. 

Surgery, Sagar Raje, Asit, Dadu beat out of 'War Coronashi' WhatsApp competition | 'युद्ध कोरोनाशी' व्हाट्सएप स्पर्धेतून केली जनजागृती, स्पर्धांमध्ये सुरश्री, सागरराजे, असित, दादू यांनी मारली बाजी 

'युद्ध कोरोनाशी' व्हाट्सएप स्पर्धेतून केली जनजागृती, स्पर्धांमध्ये सुरश्री, सागरराजे, असित, दादू यांनी मारली बाजी 

Next
ठळक मुद्दे'युद्ध कोरोनाशी' व्हाट्सएप स्पर्धेतून केली जनजागृती स्पर्धांमध्ये सुरश्री, सागरराजे, असित, दादू यांनी मारली बाजी न्यू यॉर्कच्या १२ वर्षीय राजुल पेणकरनेही घेतला सहभाग

ठाणे : कोरोनामुळे खिडकीबाहेर दिसणाऱ्या नाकारात्मकतेला सकारात्मक उत्तर देण्यासाठी  श्रीकृष्ण नॅचरल उत्पादन ठाणे आणि अस्मिता फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन चित्रकला, बालकविता, हस्ताक्षर, आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुक्रमे सुरश्री बापट, सागरराजे निंबाळकर, असित भाले, दादू जागले यांनी प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धांमध्ये बाजी मारली. विशेष म्हणजे या स्पर्धेत अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे राहत असलेल्या मराठी कुटुंबातील रिजूल पेणकर या १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने हि चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. तिने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून  'युद्ध कोरोनाशी' या विषयी व्हाट्सअँपच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. 

     'कोरोना' नामक विषाणूने साऱ्या विश्वावर आपले हातपाय पसरले आहेत. या महाशत्रूला भिडायचे तर त्याला सामोरे न जाता आपापल्या घरात बसूनच त्या विषाणूचा पराभव आपणा साऱ्यांनाच करायचा आहे. त्याची खबरदारी म्हणून आपल्या सरकारने आपला संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यास आपण प्रतिसाद देखील देत आहोत. या लॉकडाउनमुळे सारेच घरात बंदिस्त आहोत. हा लॉकडाउनच वेळ सत्कारणी लावण्यासाठी ठाण्यातील निवेदिका, लेखिका अस्मिता येंडे आणि गणेश गावखडकर यांनी या रिकाम्या वेळेत ऑनलाईन चित्रकला, कविता, निबंध आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली.  या उपक्रमास तर संपूर्ण राज्यातूनच नाही तर परदेशातून देखील उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण पाचशे जणांनी या विविध स्पर्धेमधून भाग घेतला. 5 वर्षाच्या मुलापासून 75 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचा सहभाग असणे हे महत्वाचे होते. या स्पर्धेच्या निमित्ताने घराघरातून काही चांगले मराठी वाचले गेले, लिहिले गेले, वाचन-लेखन चळवळ नकळतपणे रुजवली गेली याचे समाधान आयोजकांना मिळाले, हा प्रतिसाद पाहता भविष्यातही अशाच एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही नक्कीच करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.. या चारही स्पर्धेचे परीक्षण रामदास खरे (चित्रकला ), सुजाता राऊत (बालकविता), मनीषा चव्हाण (हस्ताक्षर स्पर्धा ) आणि दीपा ठाणेकर ( निबंध स्पर्धा ) यांनी केले. शनिवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. 

स्पर्धेचे नाव आणि विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 

१. चित्रकला स्पर्धा : प्रथम : सुरश्री प्रसाद बापट, पुणे,  व्दितीय : श्रेया संदीप नाडकर्णी, सानपाडा, तृतीय :रिजूल संदेश पेणकर, न्यूयॉर्क, USA 
उत्तेजनार्थ:- १) दर्शना मुरांजन, गिरगाव, २) सोमेश्वर संजय सावंत, अहमदनगर  ३) सहदेव शिवा तांबे, बदलापूर ४) पार्थ दीपक बिर्जे, अंधेरी ५) दीपम राजन म्हात्रे, कळवा, .
 
२. बालकविता स्पर्धा :
प्रथम:  सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर, व्दितीय : जयंत एकनाथ घेगडमल, बदलापूर,  तृतीय : सुरेख संजय ठाणेकर,ठाणे
उत्तेजनार्थ १) सुचित्रा पवार, तासगाव, २) कल्याणी श्रीकांत नेवे,  कल्याण. ३) मैत्रयी स्नेहल पाटील,मुंबई ४) राज्ञी शिरीष सोनावणे,ठाणे ५) वैशाली मुकुंदराव कुलकर्णी, अकोला... . 

३. हस्ताक्षर स्पर्धा : प्रथम -असित संभाजी भाले,  चुनाभट्टी,  व्दितीय-  हर्षाली नाईक, भिवंडी, तृतीय- पूर्वा ओझे, बदलापूर
उत्तेजनार्थ:- १ ) कल्याणी नेवे, कल्याण, २ ) श्रद्धा वझे, कल्याण ३ ) क्षमा गोडबोले, शहापूर 
विशेष पुरस्कार : १ ) नेक्षा कासट, ठाणे, २ ) युवराज जगताप, सोलापूर, ३ ) दिक्षा कमठाने , पुणे  ४ ) मधुकर कांबळे, बदलापूर, ५ ) मधुरा कसालकर,ठाणे. 

४. निबंध स्पर्धा निकाल : प्रथम :  दादू जागले , कल्याण, व्दितीय:  शालिनी वाघ , अहमदनगर , तृतीय : कल्पेश पारधी , रत्नागिरी
उत्तेजनार्थ :- १) संगीता तांबे , कल्याण, २) प्रज्ञा घैसास, डोंबिवली,  ३) अनीशा जाधव , डोंबिवली
विशेष कौतुक पारितोषिक : १) पियूष गांगुर्डे, नाशिक, २ ) युवराज जगताप, सोलापूर

Attachments

Web Title: Surgery, Sagar Raje, Asit, Dadu beat out of 'War Coronashi' WhatsApp competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.