ठाण्यातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हे सुरू, महापालिका आयुक्तांनी दिले सहाय्यक आयुक्तांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:31 PM2021-01-11T17:31:55+5:302021-01-11T17:34:17+5:30
Bird Flu News : ठाण्यात बर्ड फ्ल्युमुळे चार पक्षांचा मृत्यु झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
ठाणे - ठाण्यात बर्ड फ्ल्युमुळे चार पक्षांचा मृत्यु झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता ठाणो महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भातील जबाबदारी दिली असून त्यानुसार सोमवार पासून चिकन शॉपमधील कोबंडय़ाचा सव्र्हे सुरु झाला आहे. यामध्ये कोबंडय़ाना काही आजार आहे का?, मृत कोबंडय़ा कुठे आहेत का?, याची पाहणी केली जाणार आहे. तसेच कोंबडय़ा मृत अवस्थेत आढळल्यास त्यांचे नमुने तपासणी करुन शासनाच्या निर्देशानुसार त्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले आहेत.
मागील आठवडय़ात घोडबंदर भागात १६ पक्षांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर आता त्यातील चार पक्षांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता खबरदारीच्या दृष्टीकोनातून पालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. या संदर्भात सोमवारी सकाळी आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची तसेच आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील चिकन शॉपचा सव्र्हेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
या आदेशानंतर तत्काळ दुपार पासून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सव्र्हे करण्याचे काम ९ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकामार्फत सुरु झाले आहे. चिकन शॉपमधील कोंबडय़ाचा सव्र्हे केला जाणार असून त्यांना कोणता आजार आहे का?, याची माहिती घेतली जाणार आहे. शिवाय एखाद्या ठिकाणी मृत अवस्थेत कोंबडी आढळली तर तिचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार असून त्यानंतर त्या कोंबडय़ांची शासकीय निर्देशानुसार विल्हेवाट लावण्याचे आदेशही आयुक्तांनी संबधींत विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
अद्याप एकाही कोंबडीचा मृत्यु नाही
ठाण्यात १६ पक्षांचा मृत्यु झाला असला तरी त्यामध्ये एकाही कोंबडीचा समावेश अद्याप झालेला नाही. तसेच पालिकेकडे देखील अद्यापही तशा प्रकारची एकही तक्रार आलेली नाही. परंतु कोंबडय़ामध्ये बर्ड फ्ल्युचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने हे सव्र्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आल्याचेही पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.