सर्व्हेत ठामपा राज्यात प्रथम, तर देशात द्वितीय स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:12 AM2018-02-08T03:12:04+5:302018-02-08T03:12:13+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करत असलेल्या ठाणे महापालिकेला स्वच्छता अॅपचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र होते.
ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करत असलेल्या ठाणे महापालिकेला स्वच्छता अॅपचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र होते. परंतु आता ताज्या सर्वेक्षणानुसार ठाणे महापालिकेने या अॅपच्या सर्वेक्षणात बाजी मारून राज्यात पहिला, तर देशात दुस-या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
आजघडीला ठाणे महापालिकेच्या या स्वच्छता अॅपवर ४७ हजार ५८७ नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. तर, यातील १४ हजार ३२८ नागरिक हे त्यात अॅक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. अॅक्टिव्ह असलेल्यांची संख्या कमी असली तरीदेखील पालिकेने मात्र या अॅपच्या सर्व्हेत केवळ एका महिन्यातच २७ वरून थेट राज्यात क्रमांक-१ पर्यंतची, तर देशात दुसºया क्रमांकापर्यंतची आता येत्या काही दिवसांत देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ, असा विश्वास ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे.
स्वच्छता अॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबवणाºया ठाणे महापालिकेला या अॅपबाबत ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याची माहिती डिसेंबरच्या अखेरीस समोर आली होती. डिसेंबरअखेरपर्यंत ४० हजार नागरिकांची नोंदणी अपेक्षित असताना हे अॅप केवळ २४ हजार नागरिकांनीच डाउनलोड केले होते. परंतु, डिसेंबरअखेरची तारीख ३१ जानेवारी केल्यानंतर या कालावधीत आतापर्यंत तब्बल ४७ हजार ५८७ नागरिकांनी ते डाउनलोड केले आहे. जर ४० हजार नागरिकांनी ते डाउनलोड केले, तर १५० गुण ठाणे महापालिकेला मिळणार आहेत. आता त्यापलीकडे महापालिकेने उडी घेतली आहे. जनाग्रह अॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले आहेत.
त्यानुसार, ६ फेब्रुवारीपर्यंत हे अॅप डाउनलोड करणाºयांचा आकडा ४७ हजार ५८७ एवढा झाला असून त्याचा वापर करणाºयांची संख्या १४ हजार ३२८ एवढी आहे. तर, ३३ हजार २५९ नागरिकांनी केवळ डाउनलोड केले आहे. त्यावर आलेल्या दोन लाख एक हजार ४०५ तक्रारींपैकी तब्बल एक लाख ९९ हजार ८३७ तक्रारींचे निवारण पालिकेने केले आहे, तर एक हजार ५१६ तक्रारी रद्द केल्या आहेत.
या अॅपमुळे ५६ हजार ७५८ पैकी ५५ हजार ६७६ नागरिकांनी पालिकेने केलेल्या कामाप्रती समाधान व्यक्त केले असून केवळ ७७२ नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे. समाधान व्यक्त करणाºयांची टक्केवारी ९८.१ टक्के एवढी आहे. यामुळेच २० डिसेंबर रोजी पालिका या अॅपच्या सर्व्हेत सत्ताविसाव्या क्रमांकावर होती. आज तीच पालिका राज्यात प्रथम स्थानी तर देशात क्रमांक दोनवर आली आहे. थोड्याच दिवसांत आम्ही पहिल्या क्रमांकावर जाऊ, असा विश्वासही पालिकेने व्यक्त केला आहे.
६ फेब्रुवारीपर्यंत हे अॅप डाउनलोड करणाºयांचा आकडा ४७ हजार ५८७ एवढा असून त्याचा वापर करणाºयांची संख्या १४ हजार ३२८ एवढी आहे. तर, ३३ हजार २५९ नागरिकांनी केवळ डाउनलोड केले आहे. त्यावर आलेल्या दोन लाख एक हजार ४०५ तक्रारींपैकी तब्बल एक लाख ९९ हजार ८३७ तक्रारींचे निवारण पालिकेने केले आहे, तर एक हजार ५१६ तक्रारी रद्द करण्यात आल्या आहेत.