उल्हासनगरात धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 08:48 PM2024-05-10T20:48:17+5:302024-05-10T20:48:33+5:30

अतीधोकादायक इमारतीवर होणार कारवाई.

Survey of dangerous buildings started in Ulhasnagar | उल्हासनगरात धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

उल्हासनगरात धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

सदानंद नाईक, उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये, म्हणून इमारतीचे सर्वेक्षण प्रभाग समिती निहाय करण्यात येत असून अतिधिकादायक इमारतीवर पाडकाम कारवाईचे संकेत दिले आहे. 

उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांनी शहर अभियंता व प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी यांना शहरातील धोकादायक इमारतीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण प्रभाग समिती निहाय सुरू केले. जून २०२४ पूर्वी इमारतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून अतिधोकादायक इमारतीवर सुरक्षेचे कारण पुढे करून पाडकाम कारवाई करण्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले आहे. 

शहरातील पदपथावरील अतिक्रमणे, बेवारस वाहन उचलणे व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश यावरली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रभाग समिती अधिकाऱ्यांना दिले. चारही प्रभागात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. अतिरिकर आयुक्त लेंगरेकर यांनी घेतलेल्या बैठकीला सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी, मनीष हिवरे व दत्तात्रय जाधव यांच्यासह सर्व प्रभागातील मुकादम उपस्थित होते.
 

Web Title: Survey of dangerous buildings started in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.