तिसऱ्या पत्नीशी बोलत असल्याचा संशय, भिवंडीत तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीस ४८ तासांत अटक

By नितीन पंडित | Published: November 11, 2023 07:08 PM2023-11-11T19:08:49+5:302023-11-11T19:09:08+5:30

या गुन्ह्याचा तपास करताना मयत इसमाची ओळख पटवली सद्दाम इसहाक हुसेन,वय १९ वर्षे,रा.कामतघर,असे निष्पन्न झाले होते.

Suspected of talking to his third wife, the accused who killed a young man in Bhiwandi was arrested within 48 hours | तिसऱ्या पत्नीशी बोलत असल्याचा संशय, भिवंडीत तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीस ४८ तासांत अटक

तिसऱ्या पत्नीशी बोलत असल्याचा संशय, भिवंडीत तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीस ४८ तासांत अटक

भिवंडी: पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयाने तरुणाची हत्या केलेल्या आरोपीस गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश मधून अटक केली असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.८ नोव्हेंबर रोजी अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील निर्जन ठिकाणी झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकावलेला आढळून आला होता.त्याबाबत नारपोली पोलिस ठाणे येथे अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना मयत इसमाची ओळख पटवली सद्दाम इसहाक हुसेन,वय १९ वर्षे,रा.कामतघर,असे निष्पन्न झाले होते.

या गुन्ह्याचा नारपोली पोलिसांसह भिवंडी गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना घटनास्थळ व परिसरात लावलेली सीसीटिव्ही तपासले असता सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर,वय ४० वर्षे, रा.कामतघर याचे नाव पुढे आले.गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार,पोलिस हवालदार प्रकाश पाटील,अमोल देसाई,पोलिस नाईक सचिन जाधव,पोलीस शिपाई भावेश घरत यांचे स्वतंत्र तपास पथक तयार करून तपास सुरू केला होता.

या मध्ये संशयित आरोपी सुरेंद्र सोनकर यांच्या तिसऱ्या पत्नी सोबत मयत इसम सद्दाम हा मोबाईल वर बोलत असल्याने त्यांच्यात प्रेम संबंध आहेत व त्या मुळेच आपली पत्नी उत्तर प्रदेश येथील मूळ गावी निघून गेली या संशयातून हत्या झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेचे पथक आरोपीस पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे दाखल झाले.जौनपुर येथील बक्सा पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरेंद्र सोनकर यास भिवंडी गुन्हे शाखे च्या पथकाने अवघ्या ४८ तासात शिताफीने अटक केली.

आरोपी सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर हा सराईत गुन्हेगार असून भिवंडी सह कल्याण नवी मुंबई या भागात त्या विरोधात चोरी,घरफोडी,
जबरी चोरी अशा २५ गुन्ह्यांची नोंद आहे.विशेष म्हणजे आरोपी हा उत्तरप्रदेश येथे असलेल्या आपल्या तिसऱ्या पत्नीची सुध्दा हत्या करण्या साठी उत्तरप्रदेश येथील मुळ गावी निघाला होता अशी कबुली आरोपीने दिली अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली आहे
 

Web Title: Suspected of talking to his third wife, the accused who killed a young man in Bhiwandi was arrested within 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.