नागरिकांनी पकडलेला संशयित चोरटा पोलीस ठाण्यातून निसटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:32+5:302021-08-21T04:45:32+5:30

ठाणे : चोरीचा आरोप असलेल्या संशयित चोरट्याला स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीदरम्यान पाणी पिण्याचा बहाणा करीत त्याने ...

The suspected thief caught by the citizens escaped from the police station | नागरिकांनी पकडलेला संशयित चोरटा पोलीस ठाण्यातून निसटला

नागरिकांनी पकडलेला संशयित चोरटा पोलीस ठाण्यातून निसटला

Next

ठाणे : चोरीचा आरोप असलेल्या संशयित चोरट्याला स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीदरम्यान पाणी पिण्याचा बहाणा करीत त्याने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे शुक्रवारी पत्राद्वारे केली आहे.

वर्तकनगर परिसरात गेल्या दोन वर्षांपासून महानगर गॅसची जोडणी सुरू आहे. गॅसच्या मीटर रिडींगच्या बहाण्याने खोटे ओळखपत्र दाखवून घरामध्ये शिरून चोरी करणे किंवा एटीएम कार्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे असे प्रकार या भागात घडले आहेत. बहुतांश घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्यामुळे अशा प्रकारांमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील दक्ष नागरिकांनी प्रमोद मयेकर (४७, रा. मुंबई) या संशयित आरोपीला १७ ऑगस्ट रोजी दुपारी पकडून वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले होते. मात्र, चौकशीदरम्यान त्याने पाणी पिण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. दरम्यान, या संशयितावर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी कसे काय सोडून दिले, पोलीस असे बेजबाबदार कसे वागू शकतात, असा सवाल करीत या प्रकरणी चौकशीची मागणी नगरसेविका सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

............

प्रमोद या संशयिताला नागरिकांनी पोलीस ठाण्यात आणले होते. त्याच्या आधार कार्डद्वारे पडताळणी केली जात होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता. चौकशीदरम्यान पाणी पिण्याच्या बहाण्याने त्याने पलायन केले. त्याच्याविरुद्ध १७ ऑगस्ट रोजी रात्री चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एटीएम कार्ड चोरून ३५ हजार रुपये लुबाडल्याचा संशय असल्याने त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

- संतोष घाटेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे

Web Title: The suspected thief caught by the citizens escaped from the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.