डॉ. योगेश शर्मा यांच्यावरील निलंबन मागे, महापालिकेला सुचले शहाणपण

By अजित मांडके | Published: April 5, 2023 01:35 PM2023-04-05T13:35:31+5:302023-04-05T13:35:50+5:30

अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. परंतु त्यांना आधीचे पद देण्यात आलेले नाही.

Suspension of Dr. Yogesh Sharma back, wisdom suggested to the Municipal Corporation | डॉ. योगेश शर्मा यांच्यावरील निलंबन मागे, महापालिकेला सुचले शहाणपण

डॉ. योगेश शर्मा यांच्यावरील निलंबन मागे, महापालिकेला सुचले शहाणपण

googlenewsNext

ठाणे :  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हॉस्टेलमधील असुविधांच्या मुद्यांवरुन ठाणे महापालिकेने या रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. परंतु अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. परंतु त्यांना आधीचे पद देण्यात आलेले नाही. त्यातही मंगळवारी सुटीच्या दिवशीही महापालिकेला हे शहाणपण कसे सुचले असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ मार्च रोजी करण्यात आले यावेळी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसुतीगृहासह वाचनालय, वृत्तपत्र वाचन केंद्राचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी येथील डॉक्टर प्रामाणीकपणे रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र याच डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये असुविधा असल्याचे त्यांचे निर्दशनास आले होते. त्यानंतर संबधींत अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार अगदी काही वेळेतच याचा ठपका ठेवत या रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा व अन्य एका सहयोगी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

परंतु आता अवघ्या एका महिन्यातच डॉ. योगेश शर्मा यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची होती. अशी उपरती बरोबर एका महिन्यानंतर पालिकेला झाली असून ४ एप्रिल म्हणजेच सुटीच्या दिवशी त्यांच्यावरील ही कारवाई मागे घेण्यात आली आहे. परंतु अचानक पालिकेला हे शहाणपण कसे सुचले असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान शर्मा यांना मात्र प्राध्यापक पदाचा चार्ज देण्यात आला आहे. तर त्यांची विभागीय चौकशी सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यात ते दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Suspension of Dr. Yogesh Sharma back, wisdom suggested to the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.