कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप, मृताची पत्नी राष्ट्रवादीची पदाधिकारी

By मुरलीधर भवार | Published: February 25, 2023 01:55 PM2023-02-25T13:55:28+5:302023-02-25T13:56:15+5:30

Kalyan News: कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी नंदा भिंगारदिवे ही राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी आहे.

Suspicious death of one in Kalyan's Kolsewadi police station, serious allegations made by the family, deceased's wife is a NCP official | कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप, मृताची पत्नी राष्ट्रवादीची पदाधिकारी

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप, मृताची पत्नी राष्ट्रवादीची पदाधिकारी

googlenewsNext

- मुरलीधर भवार

कल्याण - कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी नंदा भिंगारदिवे ही राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी आहे. दीपक भिंगारदिवेच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मागणी केली आहे.

दीपक भिंगारदिवे यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असला तरी पोलिसांनी मारहाण केल्याचे आरोप फेटाळून लावले आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही उपलब्ध असून सीआयडी चौकशी केली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

पोलिसांकडून काल रात्री ऑ ल आऊट ऑपरेशन सुरु होते. त्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये प्रशिक भिंगारदिवे याला पोलिसांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आणले होते. मुलाला चौकशीकरीता का आणले याचा जाब विचारण्यासाठी प्रशिकचे वडील दीपक भिंगारदिवे हे पोलिस ठाण्यात पोहचले. पोलिस मुलाची चौकशी करीत असताना दीपक यांनी मोबाईल शूटींग सुरु केले. या कारणावरुन पोलिस आणि दीपक  यांच्यात बाचाबाची झाली. काही वेळातच दीपक भिंगारदिवे यांना फिट आली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी दीपक  यांना मयत असल्याचे घोषित केले.

या प्रकरणी दीपक यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, दीपक यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे. त्यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहे. या प्रकरणी आम्हाला न्याय पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. तोर्पयत दीपक यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. दीपक यांच्या पत्नी नंदा भिंगारदिवे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहे. हा प्रकार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कळताच त्यांनी या प्रकरणी ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दीपक यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची सीआयडी चौकशी असल्याचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज पोलिस ठाण्यातीली सीसीटीव्ही कॅमे:यात कैद आहे. सीसीटीव्ही फूटेज सीआयडीकडे तपासकराती दिले जाईल. या प्रकरणाची चौकशीकरीता आवश्यक पंचनामे ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट फस्र्ट क्लास ठाणे यांच्या समक्ष केले जाणार आहेत.

Web Title: Suspicious death of one in Kalyan's Kolsewadi police station, serious allegations made by the family, deceased's wife is a NCP official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.