स्वच्छ भारत अभियान : केडीएमसीला हगणदरीमुक्त २ प्लसचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:49 AM2019-11-27T00:49:15+5:302019-11-27T00:49:35+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Swachh Bharat Abhiyan: Certificate of Huganadari Free 3 Plus to KDMC | स्वच्छ भारत अभियान : केडीएमसीला हगणदरीमुक्त २ प्लसचे प्रमाणपत्र

स्वच्छ भारत अभियान : केडीएमसीला हगणदरीमुक्त २ प्लसचे प्रमाणपत्र

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि एसटीपी प्लांट, अशा दोन्ही सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शहरांना हगणदरी २ प्लसचे प्रमाणमिळते. महापालिकेच्या हद्दीत या दोन्ही सुविधा असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने हे प्रमाणपत्र देण्यात आले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेस ११४ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ काही टक्के रक्कम सरकारकडून मिळणार होती. तर, उर्वरित रक्कम महापालिकेने उभारणे अपेक्षित होते. महापालिकेने या अभियानांतर्गत कचरा उचलणाऱ्या गाड्या खरेदी केल्या. तसेच ६० कोटी रुपये उंबर्डे व बारावे घनकचरा प्रकल्प उभारणे, शास्त्रोक्त पद्धतीने आधारवाडी डम्पिंग बंद करणे, यावर खर्च करण्यात येणार आहेत.

स्वच्छ भारत अभियान महापालिका हद्दीत २०१४ पासून सुरू आहे. गेल्या चार वर्षांत महापालिकेस केवळ हगणदरीमुक्तीचे प्लस वनचे प्रमाणपत्र मिळाले होते. एका वर्षात महापालिकेस कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. दरवर्षी केंद्र सरकारचे पथक पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेते. महापालिकेने झोपडपट्टी परिसरातील ८३ सार्वजनिक शौचालये व रेल्वे स्थानक, बस स्थानक याठिकाणची २० सार्वजनिक शौचालये सुस्थितीत असल्याचा अहवाल तयार केला होता. त्यापैकी २६ सार्वजनिक शौचालयेही ही उत्कृष्ट असल्याचा दावा केला होता. मात्र, पथकाच्या पाहणीनंतर २६ सार्वजनिक शौचालयांपैकी २१ अस्वच्छ आढळली नाहीत. तसेच वाईट स्थितीतही नव्हती.

एक सार्वजनिक शौचालय अत्यंत चांगले आढळून आले. तर पाच सार्वजनिक शौचालये अत्यंत स्वच्छ दिसून आली. उर्वरित १७ शौचालयेही चांगल्या स्थितीत आढळून आली. त्याचबरोबर आधारवाडी, बारावे, टिटवाळा आणि टिटवाळा पश्चिमेतील मलशुद्धीकरण केंद्रांची पथकाने पाहणी करून तेथे योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात आहे का, याची पाहणी केली. त्याचबरोबर प्रक्रियेनंतर खाडी व नदीत सोडण्यात येणाºया पाण्यात बीओटी व सीओडीचे प्रमाण किती आहे, याचीही तपासणी केली. वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी सरकारने दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला आहे का, याचीही पाहणी केली.

अशी केली पाहणी
महापालिका हद्दीत साडेचार लाख मालमत्ता आहेत. त्यात वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली गेली.
सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात आहे की नाही. त्याचबरोबर कोणी उघड्यावर शौचास बसत नाही ना याचीही पाहणी पथकाने केली.

Web Title: Swachh Bharat Abhiyan: Certificate of Huganadari Free 3 Plus to KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.