जलतरणपटू मानव मोरे व आयुष तावडे करणार सलग २४ तास पोहण्याचा विक्रमी थरार
By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 23, 2024 05:04 PM2024-01-23T17:04:35+5:302024-01-23T17:05:05+5:30
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वा. मानव मोरे व आयुष तावडे हे दोन जलतरणपटू सलग २४ तास जलतरण करण्याच्या विक्रमी मोहिमेची सुरूवात करणार आहेत.
ठाणे : देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष, प्रजासत्ताक दिन व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त सलग २४ तास पोहण्याचा विक्रम करुन त्यांना अनोखी सलामी देणार आहेत. महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनच्यावतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वा. मानव मोरे व आयुष तावडे हे दोन जलतरणपटू सलग २४ तास जलतरण करण्याच्या विक्रमी मोहिमेची सुरूवात करणार आहेत.
मानवने राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे तर आयुषने राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसेच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग येथे होणाऱ्या सागरी जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग घेवून त्या यशस्वी केल्या आहेत. हे दोन्ही जलतरणपटू प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाली जलतरणाचा सराव करीत आहे. या जलतरणपटूंना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रक व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी नमूद केले आहे.