सत्ताधारी गटासह विरोधकांची तलवार म्यान
By admin | Published: July 25, 2015 04:10 AM2015-07-25T04:10:44+5:302015-07-25T04:10:44+5:30
गेल्या काही महिन्यांपासून महासभा सुरळीत सुरू राहत नसल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होत असल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू होती.
ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून महासभा सुरळीत सुरू राहत नसल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होत असल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू होती. त्यातही प्रत्येक महासभेला महापौरांना टार्गेट करून शिवसेनेतील एक गट विरोधकांबरोबर हातमिळवणी करीत असल्याची बाबही पुढे आली आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात बुधवारी महापौरांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडताना पलटवार करण्याची संधी द्या, नाहीतर राजीनामा देतो, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर, शुक्रवारी लगेचच त्याचे परिणाम महासभेत दिसून आले. महापौरांना वारंवार टार्गेट करणाऱ्या विरोधकांनी आपली तलवार म्यान तर केलीच, शिवाय महापौरांच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेतील त्या गटानेही महापौरांची पाठराखण केली. त्यामुळेच अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही महासभा पार पडल्याने महापौरांनी सर्वांचे जाहीर आभार मानले.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ठाणे महापालिकेची महासभा चांगलीच गाजत आहे. पटलावर असलेल्या विषयांना सोडून इतर विषयांना प्राधान्य देत शिवसेनेतील एका गटासह विरोधक महासभा उधळून लावत होते. त्यामुळेच महासभा संपत असतानाच्या शेवटच्या काही मिनिटांत पटलावरील विषय मंजूर करण्याची वेळ महापौरांवर येत होती. त्यामुळे पुन्हा महापौर विरोधकांच्या रडारवर येत होते. प्रत्येक महासभेला महापौरांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरत होते. याला शिवसेनेतील एक गट खतपाणी घालत असल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.
खेळीमेळीच्या वातावरणात सभा
मागील महासभेतही विरोधकांनी गदारोळ केला होता. विक्रांत चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ माजला होता.
त्यामुळेच जोपर्यंत अतिरिक्त आयुक्त आणि शिवसेनेच्या त्या महिला नगरसेविकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पुढील महासभा चालूच देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला होता.
परंतु, शुक्रवारी झालेल्या महासभेत त्यांनी आपली तलवार म्यान केल्याचे दिसून आले. शिवसेनेतील तो एक गटही महापौरांच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून आले.
त्यामुळेच ती सुरळीत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने महापौर संजय मोरे यांनी सर्व सदस्यांचे जाहीर आभार मानले.
महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्र माला खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अॅड. निरंजन डावखरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार एका क्लिकवर करता यावी आणि त्यावर २४ ते ३६ तासांत कारवाई करण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात याचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले होते.
त्यांनी वेळेच न दिल्याने आधीच लांबलेल्या या अॅपचा शुभारंभ आणखी लांबला होता. यासंदर्भातील वृत्त शुक्रवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच पालकमंत्र्यांनी अखेर या अॅपच्या शुभारंभासाठी वेळ दिला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही यंत्रणा रस्त्यावरील खड्डे यापुरतीच मर्यादित राहणार असून भविष्यात इतर नागरी सुविधांसाठीही ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे.
अत्याधुनिक यंत्रणेव्दारे खड्ड्यांची माहिती मिळावी, यासाठी ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड अॅपच्या शुभारंभाला पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अॅपच्या अखेर उद्घाटनासाठी वेळ दिला आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पालकमंत्री आणि विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या उपस्थितीत या अॅपचा शुभारंभ केला जाणार आहे.
(प्रतिनिधी)