उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर मराठा संघटनेचे लाक्षणिक उपोषण

By सदानंद नाईक | Updated: November 2, 2023 18:21 IST2023-11-02T18:21:12+5:302023-11-02T18:21:42+5:30

 उल्हासनगरातील मराठा समाजाने गुरवारी एकत्र येत, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला

Symbolic hunger strike of Maratha organization in front of Ulhasnagar district offices | उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर मराठा संघटनेचे लाक्षणिक उपोषण

उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर मराठा संघटनेचे लाक्षणिक उपोषण

सदानंद नाईक
उल्हासनगर : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील मराठा समाजाच्या वतीने गुरवारी प्रांत कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण केले. राजकीय नेत्यांना पाठिंबा द्यायचा असेलतर, त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन उपोषण ठिकाणी या, असे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले होते.

 उल्हासनगरातील मराठा समाजाने गुरवारी एकत्र येत, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. तसेच गुरवारी प्रांत कार्यालाया समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र दयावे, सारथी संस्थेची निवड करावी, शहरात मराठा सांस्कृतिक भवन उभे करावे. आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदन प्रांत अधिकारी विजयाआनंद शर्मा यांना देऊन निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविल्याची माहिती मराठा संघटनेचे पी व्ही पाटील यांनी दिली. मराठा संघटनेचे निखिल गोळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अशी मागणी यावेळी करून राजकीय नेत्यांनी पाठिंबा देण्यासाठी यायचे असल्यास, त्यांनी प्रथम पक्ष पदाचा राजीनामा देऊन यावे. असे आवाहन केले होते.

 

Web Title: Symbolic hunger strike of Maratha organization in front of Ulhasnagar district offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.