वारीला परवानगी देण्यासाठी प्रतीकात्मक दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:29+5:302021-07-18T04:28:29+5:30

भिवंडी : कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षापासून राज्य सरकारने पंढरपूरच्या आषाढी वारीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांचा हिरमोड ...

Symbolic line to allow Wari | वारीला परवानगी देण्यासाठी प्रतीकात्मक दिंडी

वारीला परवानगी देण्यासाठी प्रतीकात्मक दिंडी

Next

भिवंडी : कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षापासून राज्य सरकारने पंढरपूरच्या आषाढी वारीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे मोजक्या वारकऱ्यांसह पायी वारीस परवानगी द्यावी, तसेच हभप बंड्यातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करावी, या मागणीसाठी शनिवारी भिवंडीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वारकरी संप्रदाय यांनी कल्याण नाका येथील साक्रा देवी मंदिर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत प्रतीकात्मक दिंडी काढून राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख पदाधिकारी ॲड. मनोज रायचा, भिवंडी शहराध्यक्ष देवराज राका, प्रमिला भोईर, मुरलीधर नांदगावकर, बजरंग दल संयोजक दादा गोसावी, हभप मनोहर महाराज वडजे, हभप सुनील महाराज नाईक, डॉ. दिनकर नाईक, संध्या त्रिपाठी, जयश्री पिंपळे, बाबूलाल पुरोहित, वैभव महाडिक, विजय गुप्ता, पंकज गुप्ता, कृष्णा माने, समीर पटेल यांच्यासह वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात वारकरी भजन करत भगव्या पताका नाचवीत सहभागी झाले होते. त्यानंतर उपविभागीय कार्यालयासमोर गोल रिंगण करून आंदोलन करीत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

Web Title: Symbolic line to allow Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.