तडीपार गुंडाला एमडी पावडरची तस्करी करतांना मुंब्य्रातून अटक: चार लाखांची एमडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 09:59 PM2019-11-29T21:59:54+5:302019-11-29T22:07:17+5:30

मुंब्रा भागात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या शहानवाज शेख उर्फ शानुलाल (३५ ) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाखांची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

Tadipar Gunda arrested in Mumbra for smuggling MD powder: MD of four lakh seizes | तडीपार गुंडाला एमडी पावडरची तस्करी करतांना मुंब्य्रातून अटक: चार लाखांची एमडी जप्त

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई आरोपीला केले होते एक महिन्यांपूर्वीच पाच जिल्यातून तडीपार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/मुंब्रा: मेफेड्राँन(एमडी क्रि स्टल) या अमली पदार्थाची तस्करी करणा-या शहानवाज हारु न शेख उर्फ शानुलाल (३५, रा. एमएमआरडी बिल्डिंग,मुंब्रा ) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेली १४१ ग्रॅम वजनाची चार लाख २० हजारांची एमडी पावडर हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्रा परीसरातील रहिवाशी असलेल्या शेख हा एमडी पावडरची तस्करी करीत असल्याची माहिती पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अविराज कु-हाडे, पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे, हवालदार मोरे आदींच्या पथकाने सापळा रचून २७ नोव्हेंबर रोजी शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या झडतीमध्ये ही एमडी पावडर हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्र ी तसेच शरीर आणि मालमत्तेविरु ध्दचे गुन्हे मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी १४ आॅक्टोबर २०१९ रोजी त्याला दोन वर्षासाठी ठाणे तसेच मुंबई,रायगड,पालघर या जिल्हातून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. तरीही तो बिनधास्तपणे एमडी पावडरची विक्री करीत असतांना आढळून आल्याने त्याच्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Tadipar Gunda arrested in Mumbra for smuggling MD powder: MD of four lakh seizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.