टीएमटीला १५ कोटी देण्याचा प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:33 AM2017-07-30T02:33:16+5:302017-07-30T02:33:16+5:30

ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाºयांच्या थकबाकीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले असून पहिल्या टप्प्यातील १५ कोटींच्या थकबाकीच्या प्रस्तावावर

taiematailaa-15-kaotai-daenayaacaa-parasataava-manjauura | टीएमटीला १५ कोटी देण्याचा प्रस्ताव मंजूर

टीएमटीला १५ कोटी देण्याचा प्रस्ताव मंजूर

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाºयांच्या थकबाकीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले असून पहिल्या टप्प्यातील १५ कोटींच्या थकबाकीच्या प्रस्तावावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वाक्षरी केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका आठवड्यात कर्मचाºयांची थकबाकी देण्याचे आश्वासन अलीकडेच दिले होते. त्यामुळे येत्या मंगळवार, १ आॅगस्टपर्यंत परिवहन प्रशासनाला ही रक्कम प्राप्त होणार आहे. परंतु, आता कर्मचाºयांनीदेखील परिवहन सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि ठाणेकरांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात शिंदे यांनी वागळे आगाराचा पाहणी दौरा केला. या दौºयानंतर पालकमंत्र्यांनी परिवहनच्या कार्यशाळेसह इतर विभागांतील कर्मचाºयांची बैठक बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कर्मचाºयांना बसदुरुस्तीकरिता लागणारे किरकोळ साहित्य, त्यांची थकबाकी, पदोन्नती आदींसह इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. परिवहनमध्ये मागील कित्येक वर्षे ६१२ कर्मचाºयांची पदोन्नती झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कनिष्ठ कर्मचाºयांची पदोन्नतीही रखडलेली आहे. आता या कर्मचाºयांना पदोन्नती देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच कर्मचाºयांची विविध स्वरूपांची सुमारे ३५ कोटींहून अधिकची देणी अद्यापही देणे शिल्लक आहे. ती मिळावीत म्हणून कर्मचाºयांनी वारंवार आंदोलनेदेखील केली आहेत. परिवहन प्रशासनामार्फत १८ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील १५ कोटी देण्यावर पालिका प्रशासन सहमत झाले.

Web Title: taiematailaa-15-kaotai-daenayaacaa-parasataava-manjauura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.