‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूनाची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:11 PM2020-05-05T21:11:04+5:302020-05-05T21:28:59+5:30

माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून विचित्र त-हेने ट्रोल केले जात आहे. अगदी एन्काऊंटर करुन खूनाची धमकी दिली जात आहे. याशिवाय, पंतप्रधानांसह भाजपाच्या नेत्यांची बदनामी करणा-यांवरही कडक कारवाई केली जावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

‘Take action against those who threatened to assassinate former Chief Minister Devendra Fadnavis’ | ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूनाची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा’

बदनामी करणाऱ्यांवरही कारवाईची गरज

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे मागणीपंतप्रधानांसह भाजपाच्या नेत्यांचीबदनामी करणाऱ्यांवरही कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरुद्ध सोशल मिडियातून सुरू असलेल्या बदनामीबरोबरच राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या दबावाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे आणि अत्याचार केले जात आहेत. तसेच फडणवीस यांनाही खूनाची धमकी दिली जाते, अशा विकृतांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी सायंकाळी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार संजय केळकर आणि ठाणे शहराध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांकडून होणारे अत्याचार थांबविण्याबरोबरच बदनामी करणा-या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई केली जावी. संकटकालीन परिस्थितीमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जावी, असे आवाहनही दरेकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरोधात फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील भाषेत तसेच चित्राच्या माध्यमातून मारहाणीच्या अगदी इन्काऊंटर करुन खूनाच्या धमक्या दिल्या जातात. धर्म आणि देव देवतांची टिंगलटवाळी, साधू-संतांविषयी अत्यंत हिन मजकूर सोशल मिडियातून पसरविला जात आहे. मात्र, त्याविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्याउलट, भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटया तक्रारी दाखल करु न त्यांना मारहाण करु न दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार यांच्याकडून ठाणे आयुक्तालयातील पोलीस अधिका-यांवर दबाव आणला जातो. त्यानंतर भाजपा तसेच अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेऊन मारहाण केली जात आहे. त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जातात. या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी आयुक्तांकडे केली.

Web Title: ‘Take action against those who threatened to assassinate former Chief Minister Devendra Fadnavis’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.