यापुढील निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:28 AM2018-05-16T03:28:50+5:302018-05-16T03:28:50+5:30
अगदी प्रगत देशांमध्येही मतपत्रिकांवर मतदान केले जाते. मग आगामी लोकसभा निवडणुका या मतपत्रिकेवर घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल करून निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशिनचा आग्रह धरू नये.
ठाणे : अगदी प्रगत देशांमध्येही मतपत्रिकांवर मतदान केले जाते. मग आगामी लोकसभा निवडणुका या मतपत्रिकेवर घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल करून निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशिनचा आग्रह धरू नये. भाजपा आग्रह धरत असेल तर निवडणुकाच न घेतलेल्या बऱ्या, अशा शब्दात राष्टÑवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी ईव्हीएम मशिनच्या घोटाळ्याबाबत होणाºया आरोपांना मंगळवारी आपलाही पाठिंबा दिला.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी हा ईव्हीएम मशिनचा विजय असल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर भाष्य करतांना पाटील यांनी हे मत मांडले. राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांनी ठाण्यातील पदाधिकाºयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक औपचारिक बैठक मंगळवारी सायंकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेतली. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपले हे मत प्रदर्शित केले. कर्नाटकात आपणही निवडणूक काळात गेलो होतो, तिथे सामान्य माणसे किंवा शेतकºयांनीही सरकारचे काम चांगले असल्याबद्दल दाद दिली होती. काँग्रेस विरोधात बोलतांना कोणी आढळले नाही. काँग्रेसचे काम चांगले असतांना, असा निकाल लागणे अनपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. अगदी काही राज्यांत तर संख्याबळ नसतांनाही काही सदस्यांच्या मदतीने छोट्या पक्षांची मोडतोड करून भाजपने सत्ता स्थापन केली आहे. मुळात, कुठेही सत्ता येण्यासाठी पूर्ण बहुमत असणे गरजेचे आहे. तसे झालेले नाही. भाजपाची लाट ओसरली आहे. त्यामुळे आतापासूनच काँग्रेस राष्टÑवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढविण्यासाठी कार्यरत झाले आहेत. कळवा मुंब्रा प्रमाणे ठाणे शहरातही राष्टÑवादी वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील, लोकांची मनेही जिंकणार असेही ते म्हणाले. कोकण पदवीधर मतदार संघात काँग्रेस राष्टÑवादीने सर्वाधिक नोंदणी केली आहे. पाकिस्तानातून केंद्राने साखर आयात केलेल्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.
>पक्षांतर्गत नाराजी शमविण्यासाठी डावखरे यांच्यासह विविध पदाधिकाºयांशी चर्चा
कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना किंवा भाजपातून आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक लढवतील, अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. त्याचा डावखरे यांनी मात्र इन्कार केला आहे. एकीकडे कळवा मुंब्रा या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातही त्यांच्याच पक्षाचे मंदार केणी यांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर निरंजन डावखरे तसेच मुकुंद आणि प्रमिला केणी हे नगरसेवक दाम्पत्य त्यांचा मुलगा मंदार यांच्यासह शहराध्यक्ष आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे अशा अनेक मंडळींशी आव्हाड यांच्या मध्यस्थीने पत्रकार परिषदेनंतर जयंत पाटील यांनी उमेदवारीबाबत गुप्तगू केले.
पालघरमध्ये दामू शिंगडा विजयी होतील..: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या मुलाला उमेदवारी देण्याची भाजपची मानसिकता नव्हती. त्यात गावितांनीही गद्दारी करून भाजपातून प्रवेश मिळविला. मात्र, काँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार दामू शिंगडा हेच तिथे बाजी मारतील, असा दावाही पाटील यांनी केला. तसेच बीडमध्ये जगदाळे हेच राष्टÑवादीचे उमेदवार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.