हत्या, आत्महत्या प्रकरणात तत्काळ कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 02:32 AM2020-06-19T02:32:00+5:302020-06-19T02:32:15+5:30

बदलापूरची घटना; महिला आयोगाने घेतली दखल

Take immediate action in case of murder or suicide | हत्या, आत्महत्या प्रकरणात तत्काळ कारवाई करा

हत्या, आत्महत्या प्रकरणात तत्काळ कारवाई करा

Next

बदलापूर : बदलापूर येथील आठ वर्षीय मुलीची हत्या व तिच्या आईची आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाची राज्य महिला आयोगाने स्वत:हून गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन आयोगाने हे आदेश दिले आहेत.

फ्लॅटसह विविध कारणांसाठी सतत पैशाची मागणी तसेच घटस्फोट द्यावा यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मीना पाटील या विवाहितेने आठ वर्षांच्या मुलीचा चाकूने गळा चिरून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना बदलापूर येथे १० जून रोजी रात्री ११ वाजता घडली. या घटनेला मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला पती व सासू जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी मीना हिच्या वडिलांनी मंगळवारी ठाणे, अंबरनाथ व बदलापूर येथे पोलीस अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी टोलवाटोलवी करून मीना यांच्या वडिलांचा जबाब लिहून घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे टाळले. हा जबाब महत्त्वाचा असून त्याआधारे पुढील कारवाई करू, असे सांगून नातेवाइकांची बोळवण केली. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कुळकर्णी यांना विचारले असता, हे प्रकरण माझ्याकडे आहे. मुलीच्या वडिलांना सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगण्यात आल्या आहेत, आपण त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिलेली आहे; मात्र आपण गुन्हा का दाखल केला नाही, या प्रश्नावर बोलणे मात्र त्यांनी टाळले. एकंदरीतच या प्रकरणात मीना हिचे पती अशोक पाटील पोलीस दलात असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न बदलापूर पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप वडील दिलीप पाटील यांनी केला.

राज्य महिला आयोगाच्या समुपदेशक सुनीता गणगे यांनी पोलीस अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर प्रकरण गंभीर असून आयोगाने स्वत:हून त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तत्काळ योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोगास सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

Web Title: Take immediate action in case of murder or suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.