पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करावे : भैय्याजी जोशी

By अनिकेत घमंडी | Published: April 11, 2023 06:58 PM2023-04-11T18:58:24+5:302023-04-11T18:58:36+5:30

संघ स्वयंसेवकांचा सत्कार, अभ्युदय प्रतिष्ठान संस्थेचा कार्यक्रम.

Take inspiration from Padma Shri awardees to do social work: Bhaiyyaji Joshi | पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करावे : भैय्याजी जोशी

पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करावे : भैय्याजी जोशी

googlenewsNext

डोंबिवली: पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजापेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्य़ा मंडळीचे काम प्रेरणा देणारे आहे. विचारांना दिशा देणारे काम आहे. ते काम समजून घेतले पाहिजे आणि या मार्गावर आपण ही चालले पाहिजे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन त्याला सामाजिक कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी व्यक्त केले.

येथील अभ्युदय प्रतिष्ठानतर्फे डोंबिवलीत पद्म पुरस्कार प्राप्त संघ स्वयंसेवकांचा गौरव सोहळा टिळकनगर शाळेच्या पटांगणात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भैय्याजी जोशी बोलत होते. त्या सोहळयात गिरीश प्रभूणे, प्रभाकर मांडे, रमेश पतंगे, भिकूजी (दादा) इदाते, गजानन माने यांचा सन्मान करण्यात आला. प्रभाकर मांडे या कार्यक्रमाला काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही.

यावेळी रा.स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, सत्कारमूर्ती गिरीश प्रभुणे, गजानन माने,रमेश पतंगे, दादा इदाते,अभ्युदय प्रतिष्ठान डोंबिवलीचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. जोशी पुढे म्हणाले की पद्मश्री पुरस्कार पूर्वी कोणाला मिळत होते हे समजत नव्हते. पण गेल्या काही वर्षापासून एक नवीन अनुभव घेत आहे. अर्ज येतात मग त्यांची छाननी होते. या व्यासपीठावरील मंडळी पुरस्कारासाठी काही धडपड न करणारी आहेत. पुरस्कार यांच्याकडे चालत आले आहेत.

पुरस्कारासाठी व्यक्ती शोधताना दृष्टी नीट नसेल योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळायला अनेक वर्ष जावी लागतात. समाजातील मोठा वर्ग अनेक गोष्टीपासून उपेक्षित आहे ,कोणी जीवनावश्यक अनेक गोष्टीपासून वंचित आहे. पैसे मिळाला म्हणून सगळे मिळते असे नाही. पैसे कसा ही मिळविता येतो. पण समाजातील हा असा दुर्लक्षित, उपेक्षित असलेला मोठा वर्ग आपली वाट पाहत आहे. त्यांच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार आहे? कोण त्यांना आपल्या बरोबरीने उभे करणार आहे? त्यांना आपल्या बरोबरीने चालण्याचे साम्थर्य कोण देणार आहे? संघाच्या संस्कारातून आपण आलो आहे.

संघाच्या विचारांशी बांधिलकी आहे. आणि संघाची बांधिलकीचा अर्थच सामाजिक बांधिलकी आहे. ही बांधिलकी कर्मप्रमण करणारी असली पाहिजे. निराशा करणारी असू नये. सत्काराचा असे कार्यक्रम आपल्याला विचार करायला लावणारे आहेत, असे ही त्यांनी सांगितले. टिळकनगर शिक्षण मंडळ, कल्याण जनता सहकारी बॅक, जनकल्याण समिती, अखिल भारतीय साहित्य परिषद, गणेश मंदिर संस्थान, उज्वल चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सत्कारमूर्तीचा सत्कार केला.

Web Title: Take inspiration from Padma Shri awardees to do social work: Bhaiyyaji Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.