त्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालिका यंत्रणेवर कठोर कारवाई करा : मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 06:28 PM2020-09-24T18:28:40+5:302020-09-24T18:36:57+5:30

पालिकेच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाग्रस्ताला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

Take stern action against the municipal body that caused the death of that coronary victim: MNS demand | त्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालिका यंत्रणेवर कठोर कारवाई करा : मनसेची मागणी

त्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालिका यंत्रणेवर कठोर कारवाई करा : मनसेची मागणी

Next
ठळक मुद्देकोरोनाग्रस्ताच्या मृत्यूस पालिका यंत्रणा जबाबदार - मनसे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी - संदीप पाचंगे पालिका आयुक्तांना मनसेचे निवेदन

ठाणे : ठाणे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एका ५९ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करीत या प्रकरणात निष्काळजीपणा करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या संबंधिताची चौकशी होऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसेने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.


भिवंडी येथे राहणारे वासुदेव पाल यांना ६ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल २४ तासांत येणे अपेक्षित असताना तब्बल तीन दिवसांनी म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला. या रुग्णाला बाकीचे देखील आजार होते. पाल यांच्या नातेवाईकांनी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करुनही बाळकूम येथील कोव्हीड हॉस्पीटलमध्ये रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. अखेर १३ सप्टेंबरला ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पीटमलमध्ये आणले आणि १२ तासांत हा रुग्ण दगावला असे मनसेने या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या सासºयाचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांचे जावई अखिलेश पाल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे केली. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पाचंगे यांनी निष्काळजीपणा करणाºया संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*मृत व्यक्तीस वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे आणि मनसे या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे.
- संदीप पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष मनविसे

*या प्रकरणाची चौकशी करुन निर्णय घेतला जाईल.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

*सासऱ्यांना कोव्हीड हॉस्पीटलमध्ये आयसीयु बेड मिळावा यासाठी ठाणे महापालिकेतील संबंधित अधिकाºयांना विनवण्या करीत होतो. कळवा हॉस्पीटल हे कोव्हीड हॉस्पीटलमध्ये नसतानाही त्यांना पाच दिवस तेथे दाखल करुन घेतले होते आणि सहाव्या दिवशी ग्लोबल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. हे वेळीच झाले असते तर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला नसता.
े- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईक

Web Title: Take stern action against the municipal body that caused the death of that coronary victim: MNS demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.