तारापूर समुद्र्रातून ‘त्या’ ट्रोलर्स ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:09 AM2017-09-01T05:09:26+5:302017-09-01T05:09:46+5:30
गुजरातच्या ‘राम प्रसाद’ ही ट्रोलर्स बुधवारी पालघरच्या समुद्रात बुडाल्या. त्यातील हरवलेल्या प्रेमसाई व साई नारायण या दोन्ही ट्रोलर्सचा शोधण्यात मेरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशनच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश आले आहे.
हितेन नाईक
पालघर : गुजरातच्या ‘राम प्रसाद’ ही ट्रोलर्स बुधवारी पालघरच्या समुद्रात बुडाल्या. त्यातील हरवलेल्या प्रेमसाई व साई नारायण या दोन्ही ट्रोलर्सचा शोधण्यात मेरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशनच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश आले आहे. तारापूरच्या समुद्रात मासेमारी करीत असलेल्या या दोन्ही ट्रोलर्सना ताब्यात घेऊन त्यांच्या बंदरात त्यांना रवाना करण्यात आल्या.
गुजरात राज्यातील नवाबंदर येथील मच्छिमार राम भाई सोलंकी यांच्या राम प्रसाद, प्रेमसाई व सत्यनारायण याा तीन ट्रोलर्स असून त्या २५ आॅगस्ट रोजी कवींच्या मासेमारी साठी रवाना झाल्या होत्या. मासेमारी साठी गेलेल्या या ट्रॉलर्स वादळात सापडल्या. प्रवाहाने वाहत येत यापैकी राम प्रसाद बुधवारी पहाटे बुडाली. त्यातील दहा मच्छीमाराना जवळच मासेमारी करणाºया प्रेमसाई या ट्रोलर्स ने वाचिवले.
मात्र या दोन ट्रोलर्स शोधताना मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे अडथळे येत होते. गुरु वारी पहाटेच दमण येथून कोस्टगार्डच्या डॉर्निअर एअरक्र ाफ्ट आणि स्पीड बोटने शोध मोहीम सुरू केल्या. तेव्हा सकाळी या दोन्ही ट्रॉलर्स तारापूर च्या समुद्रात ३७ नॉटिकल क्षेत्रात मासेमारी करताना आढळल्या. त्यांच्या जवळ गेल्यावर रामप्रसाद बुडाल्यानंतर सर्वाना आम्ही वाचिवले. नंतर समुद्र शांत झाल्यामुळे आता मच्छीमारी करूनच आपल्या बंदरात परत जाऊ असे ठरवून आम्ही दोन दिवस मासेमारी करीत असल्याचे मच्छीमारांनी सांगितल्याचे डहाणू विभागाचे कमांडन्ट एम. विजयकुमार यांनी लोकमतला सांगितले. त्या ट्रोलर्स आपल्या बंदराकडे रवाना झाल्या.