ठाण्यात जाताय मोबाइल सांभाळा; सहा महिन्यांत १०६ तक्रारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:06+5:302021-07-08T04:27:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या सहा महिन्यांत १६३ मोबाइल चोरीस गेले असून त्यातील ३८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या सहा महिन्यांत १६३ मोबाइल चोरीस गेले असून त्यातील ३८ मोबाइल मिळविण्यात पोलिसांना यश आले. तीनहातनाका भागात तर रिक्षातून जाणाऱ्या तरुणीला मोबाइल चोरट्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे ठाण्यातील रस्त्यावरून जाताना आपला मोबाइल सांभाळा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेटमधील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये २०२० मध्ये मोबाइल चोरीचे २१५ गुन्हे नोंद झाले. यात २७९ मोबाइलची चोरी झाली. त्यातील ३० मोबाइल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. पूर्वीप्रमाणे आता केवळ मोबाइल चोरीच नाही तर जबरी चोरीही होऊ लागली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे, रिक्षातून प्रवास करणारे तसेच पायी जाणाऱ्यांकडूनही मोबाइल हिसकावण्याचे प्रमाण वाढले आहे. तीनहातनाका ते घोडबंदर रोडवरील कापूरबावडी परिसरातील रस्त्यावर तसेच मुंब्रा आणि वागळे इस्टेटमध्ये मोबाइल चोरी आणि जबरीचे प्रमाण अधिक आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि वागळे इस्टेटचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाइल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती केली आहे. अलीकडेच नौपाडा पोलिसांनी भिवंडीतून दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. याच चोरट्यांमुळे रिक्षातून जाणा-या तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता.
...........................................
*गेल्या दीड वर्षात ४४२ मोबाइलची चोरी
तक्रारी परत मिळाले
२०१९ - आकडेवारी उपलब्ध नाही
२०२०- २१५ (२७९ मोबाइलची चोरी)- ३०
२०२१ जानेवारी ते जून
तक्रारी - मिळाले
परिमंडळ १- ठाणे शहर-३९- ५
परिमंडळ २- भिवंडी- १९-६
परिमंडळ ३- कल्याण- ५५- ८
परिमंडळ ४- उल्हासनगर- २५-७
परिमंडळ ५- वागळे इस्टेट- १६३-३८
..................................
जोड आहे