'कारवाई टाळण्यासाठी २० लाख घेता', आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप

By अजित मांडके | Published: January 28, 2023 03:06 PM2023-01-28T15:06:42+5:302023-01-28T15:07:42+5:30

Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना सज्जड दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर चांगलीच वायरल झाली आहे

Taking 20 lakhs to avoid action, MLA Jitendra Awhad made serious allegations against the Assistant Commissioner | 'कारवाई टाळण्यासाठी २० लाख घेता', आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप

'कारवाई टाळण्यासाठी २० लाख घेता', आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप

googlenewsNext

- अजित मांडके
ठाणे -  कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना सज्जड दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर चांगलीच वायरल झाली आहे. कारवाई टाळण्यासाठी तुम्ही पैसे घेऊन खिशात भरता आणि तुमचे नाव लपवून मला बदनाम करता असा गंभीर आरोपही त्यांनी केल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे. त्यात आजच्या घडीला कळवा, खारेगावात २९ बांधकामे सुरु आहेत. असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.

कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याबरोबर फोनवर झालेले संभाषण सध्या सोशल मिडियावर चांगलेच वारयर झाले आहे. रोहीदास पाटील यांना जितेंद्र आव्हाड यांनी कारवाई करायला सांगितले त्यानुसार तुम्ही कारवाई करीत आहात, असे या ऑडीओ क्लिपमध्ये दिसत आहे. त्याच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इतर अनाधिकृत इमारती दिसल्या नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र त्यावर सहाय्यक आयुक्तांची उत्तर देतांना भंभेरी उडाल्याचे दिसत आहे. आयुक्त सांगतात की, सात मजले तोडू नका, प्लींथ प्लस वन असेल तर ते तोडा, परंतु सात मजली इमारत असले तर त्यावर कारवाई करायची नाही का? असा सवालही त्यांनी केला. रोहीदास पाटील यांच्याकडून तुम्ही २० लाख घेतले असा गंभीर आरोपही त्यांनी यात केल्याचे दिसत आहे. हे चुकीचे आरोप असल्याचे ठाणोकर यांनी केल्याचे दिसत आहे. तर ज्याने पैसे दिले तो माणूस समोर उभा करु का? असा सवालही त्यांनी केला.

कळवा आणि खारेगाव मध्ये टारगेट करता आणि माङो नाव पुढे करता, पण मी कधीच कोणाचे वाईट करायला सांगत नाही. असेही त्यांनी यात स्पष्ट केले आहे. तुम्ही पैसे घेऊन खिशात भरता आणि माङो नाव पुढे करता, इतर इमारती का पाडत नाही? असा सवालही त्यांनी केला. नवीन चालू असतील ती पाडायची आणि जी पूर्ण झाली असतील ती पाडायची नाही का? उद्या चौकशी लागली तर धूर निघेल आणि यात भरडली जातील तुमचे घरचे असेही त्यांनी सांगितले. तुम्हाला जर मान्य नसेल तर तुमची आणि माझी वयक्तीक लढाई सुरु झाली असून तुम्ही कोणा कोणाकडून पैसे घेता हे दाखवून देईन, उच्च न्यायालयात जाईन असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Taking 20 lakhs to avoid action, MLA Jitendra Awhad made serious allegations against the Assistant Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.