शहापुरातील तलाठी कार्यालय टाळेबंद!
By admin | Published: July 17, 2017 01:08 AM2017-07-17T01:08:25+5:302017-07-17T01:08:25+5:30
शहापूर तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालये नेहमीच टाळेबंद असल्याने तलाठ्यांच्या शोधासाठी शेतकरीवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ससेहोलपट सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसनगाव : शहापूर तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालये नेहमीच टाळेबंद असल्याने तलाठ्यांच्या शोधासाठी शेतकरीवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ससेहोलपट सुरू आहे.
अनेकांचे मोबाइलही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी मिळणारे शासकीय अनुदान तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळवणे कठीण झाले आहे. महसुली गावांत असलेली ही तलाठी कार्यालये नेहमी बंद असल्याने पदरमोड करत येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे घालण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. याबाबत, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र खंडवी यांनी शहापूरचे तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांच्याकडे लेखी तक्र ार करून कैफियत मांडली आहे.
काही महिन्यांपासून जमिनीचे सातबारे, फेरफार, आठ ‘अ’ उतारे आॅनलाइन करण्याचे आदेश महसूल विभागाने तलाठ्यांना दिले आहेत. मात्र, अद्याप या आदेशाची पूर्तता झालेली नाही. तलाठी कार्यालयांत त्यांच्याविरु द्ध तक्र ार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांकदेखील नाही. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, असेही खंडवी यांनी आपल्या तक्र ारीत म्हटले आहे.