मोबाईल वरून दिला तलाक; भिवंडीत तिघांविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Published: September 6, 2023 04:14 PM2023-09-06T16:14:33+5:302023-09-06T16:15:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : मोबाईल वरून पत्नीला तलाक देण्यात आल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या पतीने ...

Talaq given from mobile phone; A case has been registered against three people in Bhiwandi | मोबाईल वरून दिला तलाक; भिवंडीत तिघांविरोधात गुन्हा दाखल

मोबाईल वरून दिला तलाक; भिवंडीत तिघांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मोबाईल वरून पत्नीला तलाक देण्यात आल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या पतीने आपल्या मोबाईल वरून तीन वेळा तलाक तलाक तलाक बोलून भिवंडीत माहेरी असलेल्या आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे.याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पतीसह नणंद व नंदेचा पती अशा तिघांविरोधात मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       शहरातील दर्गारोड या परिसरात राहणारी कशीश मेहताब अन्सारी वय २३ हीचे मुंबई साकीनाका परिसरात राहणाऱ्या मेहताब आजमगीर अन्सारी सोबत निकाह झाला होता.१७ जून ते १४ ऑगस्ट २०२३ या काळात पती मेहताब अन्सारी,नंदोई मोहम्मद रफी अन्सारी,नणंद आलीया मोहम्मद रफी अन्सारी यांनी आपापसात संगणमत करून विवाहित पीडितेचा मानसिक,शारीरीक छळ करीत मारहाण केली.तर नणंदेचा पती याने वेळोवेळी अश्लील नजरेने पाहुन विवाहितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शिवीगाळी केली होती.त्यांनतर पती मेहताब अन्सारी याने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी मोबाईल वर संपर्क साधत फोन वरून तीन वेळा तलाक तलाक तलाक असे बोलून पत्नीस बेकायदेशीर तलाक दिला.या प्रकरणी कशीश मेहताब अन्सारी या पिडीतेने दिलेल्या तक्रारी वरून भोईवाडा पोलिस ठाण्यात पती मेहताब अन्सारी, नंदोई मोहम्मद रफी अन्सारी,नणंद आलीया मोहम्मद रफी अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Talaq given from mobile phone; A case has been registered against three people in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.