तळोजा-शीळ-कल्याण मेट्रो रेल्वेचा डीपीआर 15 दिवसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:56 PM2018-02-28T17:56:56+5:302018-02-28T18:06:31+5:30
तळोजा-शीळ-कल्याण मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. आज बुधवारी एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत ही माहिती आयुक्त मदान यांनी खासदार शिंदे याना दिले.
कल्याण : तळोजा-शीळ-कल्याण मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. आज बुधवारी एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत ही माहिती आयुक्त मदान यांनी खासदार शिंदे याना दिले. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि गटनेते रमेश जाधव उपस्थित होते. कल्याण-शीळ-तळोजा या मेट्रो मार्गाचे सादरीकरण खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले होते. कल्याण-शीळ-तळोजा मेट्रो रेल्वेच्या सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसात पूर्ण होणार असून कल्याण रिंगरोडचे कामही येत्या महिन्या भरात सुरु होईल असे खासदार शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य होणार आहे. मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल नऊ महिन्यांत तयार होईल, असे एमएमआरडीएने गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत सांगितले होते, त्याबाबत खासदार शिंदे यांनी विचारणा केली असता, हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 15 दिवसांत सविस्तर प्रकल्प अहवाल निश्चित केला जाईल आणि त्यानंतर तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे.
कल्याण आणि डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक असलेल्या रिंग रुटचे कामही अद्याप सुरू न झाल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर जवळपास 80 टक्के भूधारकांनी संमतीपत्ने दिली असून दुर्गाडी ते गांधारे या टप्प्याचे काम येत्या महिन्याभरात सुरू करण्याची ग्वाही मदान यांनी दिली. रिंग रूट प्रकल्पाचे सात टप्पे करण्यात आले असून दुर्गाडी ते गांधारे या चौथ्या टप्प्याचे काम सर्वप्रथम सुरू होणार आहे. दुर्गाडी ते डोंबिवली या टप्प्यातील भूसंपादनात काही अडचणी असून हे कामही येत्या महिन्याभरात मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याची माहिती श्री. मदान यांनी दिली. यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्यासमवेत गुरु वारी 1 मार्च रोजी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली.
डोंबिवलीहून ठाणे-मुंबईला थेट येता यावे, यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मोठागाव ठाकूर्ली-माणकोली खाडी पुलाचे माणकोली बाजूकडील काम रखडल्याचाही मुद्दाही खासदारांनी उपस्थित केला. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही अनेकदा विषय मांडला. स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कामाला गती देण्याचे निर्देश दिल्याकडे खासदारांनी सांगितले. त्यावर माणकोली बाजूकडील भूसंपादनाच्या प्रक्रि येने वेग घेतला असल्याचे आयुक्त मदान यांनी सांगितले. जिल्हाधिका-यांच्या स्तरावरील सर्वेक्षण प्रक्रि-या पूर्ण झाली असून त्यानुसार आता भूसंपादन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात भूसंपादनाची प्रक्रि-या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे मदान यानी स्पष्ट केले आहे.