तालुका कृषी कार्यालय वर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:58 AM2019-04-03T03:58:46+5:302019-04-03T03:59:03+5:30

किन्हवलीतील शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड : योजनांसाठी जावे लागते तालुक्याला, बसण्यासाठी जागेचा अभाव

Taluka Agricultural Office for years, in the rented room | तालुका कृषी कार्यालय वर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत

तालुका कृषी कार्यालय वर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत

googlenewsNext

वसंत पानसरे

किन्हवली : किन्हवली परिसरात बहुतांशी शेतकरी असून उपजीविकेसाठी शेतीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांची माहिती घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. परिणामी, किन्हवली भागातील शेतकऱ्यांना याचा नाहक भूर्दंड सहन करावा लागतो आहे. त्यामुळे कृषी मंडळ कार्यालय किन्हवलीत सुरू करण्याची मागणी या शेतकºयांनी केली आहे.
शासकीय कृषी विभाग कार्यालय कित्येक वर्षांपासून भाड्याच्या घरात असल्याने शहापूर तालुक्यातील शेतकºयांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. तालुक्यातील लाखो शेतकरी शेतीसह फळबाग, फुलबाग, फळभाज्या लागवडीवर भर देतात. शासनाच्या विविध योजनांबाबत कृषी अधिकारी तसेच कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करतात. मात्र, या शेतकºयांना तालुका कृषी कार्यालयात बसण्याचीही जागा नसून वाहने अडगळीत उभी करावी लागतात.

कृषी विभाग कार्यालय भाड्याच्या घरात असून येथे अनेक समस्या आहेत. शेती विषयक आणि शासकीय योजनांचे माहिती फलक उपलब्ध नसून नोटीस बोर्ड तसेच पिण्याच्या पाण्याची आणि बैठकीची पुरेशी सोय नसल्याने शेतकºयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शेतकºयांची ही परिस्थिती तर शासकीय कर्मचाºयांना देखील बसण्याची आणि उपकरणे ठेवण्याची पुरेशी जागा नसल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, शहापूर तालुका कृषी विभागासाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी तालुक्यात जोर धरते आहे. तालुक्यात कार्यरत असणारे सहायक तसेच पर्यवेक्षक शेतकºयांच्या भेटीसाठी जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. किन्हवली मंडळ कार्यालय हे शहापुरातच असल्याने या भागातील शेतकºयांना शहापूरला यावे लागते. आदिवासीबहुल तालुका असणाºया शहापुरात शेती हा मुख्य व्यवसाय असून शेती हे उपजीविकेचे साधन आहे. तालुक्यात योजना केवळ कागदोपत्री राबविल्या जात असल्याचा आरोप होत आहे.
खर्डी, किन्हवली, शहापूर या तीन मंडळात ३८ कृषी सहाय्यक आहेत. तालुक्यातील शेतकºयांना शेतीबाबत माहिती तसेच मार्गदर्शनाची गरज असून मंडळ अधिकाºयांसह कृषी सहाय्यकांनी गावागावात जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

शासन परिपत्रकानुसार कृषी मंडळ कार्यालय तालुक्याच्याच ठिकाणी असते. मात्र, किन्हवलीतील शेतकºयांसाठी आम्ही किन्हवली ग्रा.पं.मध्ये गॅझेट आॅफिसर बसवत होतो. शेतकºयांची गैरसोय होत असेल तर ग्रामपंचायतीला पत्र देऊन तिथे जर गॅझेट आॅफिसर बसण्याची व्यवस्था झाली, तर आम्ही तिथे गॅझेट आॅफिसर बसवू.
- दिलीप कापडणीस,
कृषी अधिकारी, शहापूर

Web Title: Taluka Agricultural Office for years, in the rented room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.