टीएमटीच्या ३९ लिपिकांच्या नोकरीवर टांगती तलवार

By admin | Published: April 12, 2016 01:08 AM2016-04-12T01:08:32+5:302016-04-12T01:08:32+5:30

आधीच डबघाईला आलेल्या टीएमटीवर आता आणखी एक संकट ओढवले आहे. परिवहन सेवेत मागील अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या ३९ लिपिकांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tamdish Talwar on the job of TMT's 39 clerks | टीएमटीच्या ३९ लिपिकांच्या नोकरीवर टांगती तलवार

टीएमटीच्या ३९ लिपिकांच्या नोकरीवर टांगती तलवार

Next

ठाणे : आधीच डबघाईला आलेल्या टीएमटीवर आता आणखी एक संकट ओढवले आहे. परिवहन सेवेत मागील अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या ३९ लिपिकांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी अनेकांना टायपिंगच येत नसल्याचे उघडकीस झाल्यानंतर सोमवारी त्यांची परीक्षा घेण्यात आली. तिचा निकाल लागल्यानंतर या ३९ जणांपैकी ज्यांना टायपिंग येत नाही, अशांची सेवा खंडित केली जाण्याची शक्यता आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या उपक्रमामध्ये ३९ लिपीक कार्यरत आहेत. यापैकी अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय पालिका प्रशासनाला आहे. अपवादाने काही लोक सोडल्यास अनेकांना टायपिंगच येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब उघड झाल्यानंतर या सर्वांची सोमवारी खोपट येथील कॉम्फ्युटर आणि टायपिंग इन्स्टीट्यूट येथे टायपिंगची परीक्षा घेण्यात आली आहे. तिचा निकाल लागल्यानंतर ज्यांना टायपिंग येत नाही, अशांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: Tamdish Talwar on the job of TMT's 39 clerks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.