अधिकाऱ्यांनी जे सांगितले तेच तानाजी सावंत बोलले - तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:14 AM2019-07-07T00:14:58+5:302019-07-07T00:15:05+5:30
जलसंधारणमंत्र्यांची केली पाठराखण। राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर
ठाणे : तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले, असे बेताल वक्तव्य करणारे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठराखण केली आहे. ही चूक त्यांची नसून त्यांना ब्रीफ करणाºया अधिकाऱ्यांची असल्याचा दावा तावडे यांनी केला. सावंत यांना सोडून त्यांनी अधिकाºयांनाच दोषी ठरवल्याने संताप व्यक्त होत आहे.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाण्यात भाजपाच्या संघटनापर्व सदस्यता अभियान २०१९ च्या शुभारंभासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी खरे कारण काय आहे, बांधकाम कच्चे होते, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही सांगितले. दुसरीकडे आव्हाडांनी केलेले आंदोलन हा केवळ एक स्टंट असून, जर त्यांना या घटनेचे खरोखरच गांभीर्य असते, तर त्यांनी असे आंदोलन करण्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन मदत केली असती, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे दोघे एकत्रित करत असलेल्या दौºयाबाबत त्यांना छेडले असता, आदित्य म्हणजे नवीन पिढीसाठी एक चांगली गोष्ट असून त्यांच्याकडून ज्या पद्धतीने दौरे सुरू आहेत, ते स्वागतार्हच आहे.
ठाण्यातील संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ निमित्त मराठी कलाकार अशोक समेळ, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, खगोलतज्ज्ञ दा.कृ. सोमण, उद्योजक समीर नातू आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी भाजपा सदस्यनोंदणी करून भाजपात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकारण हा माझा विषय नाही. खगोलशास्त्र हा माझा विषय आहे. परंतु, भारताची प्रगती घडवायची असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. विज्ञानाचा प्रचार होणे गरजेचे आहे. म्हणून, भाजप आणि त्याचे नेतृत्व यांच्याकडून जनतेला आशा आहे, यासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. देशाची अनेक दृष्टीने प्रगती होत असल्याने प्रत्येकाने त्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे.
- दा.कृ. सोमण : ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ
मला अभिमान वाटत आहे, मी सदस्य झाल्याचा. ज्या पक्षाला देशातील जनतेने एकमताने कौल दिला. देशाची सेवा करण्याची संधी दिली आणि आता ती सेवा करण्याची संधी मलासुद्धा आता यानिमित्ताने मिळणार आहे. कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांच्या समस्या सोडवण्याची गरज असून त्या सोडवण्यासाठी शासनदरबारी मागणी करणार आहे.
- अभिजित चव्हाण : सिनेकलावंत
तावडे यांनी माफी मागावी - आव्हाड
आम्ही स्टंट करतो, असे म्हणणाºया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे हे स्वत:ला कोकणवासीय म्हणवून घेत आहेत. पण, त्यांनी महाराष्ट्राला हादरवून सोडणाºया दुर्घटनेचाही ‘विनोद’ केला आहे. एकीकडे सबंध कोकण दु:खात असताना कोकणपुत्र त्यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्र मात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्यानाचे उद्घाटन करतात. तर, ते आपल्यातील असंवेदनशीलतेचे प्रदर्शन घडवतात. ते कोकणपुत्र असूनही कोकणी माणसांच्या जखमांवर मीठ चोळतात, त्यामुळे त्यांनी आधी कोकणवासीयांची माफी मागावी. नंतर पुढचे बोलावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ’खेकडा’ आंदोलनावर तावडे यांनी टीका करताना आव्हाड हे स्टंट करत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या टीकेचा आव्हाड यांनी उपरोक्त भाषेत समाचार घेतला. एकीकडे तिवरे पंचक्र ोशीत शोककळा पसरलेली असताना तावडे हे अशा कार्यक्र माचे आयोजनच कसे काय करतात? दोन दिवस हा उद्यान उद्घाटनाचा कार्यक्र म पुढे ढकलला असता तर अवकळा आली नसती. सबंध कोकण दु:खात अश्रू ढाळत असताना तावडेंना आनंद साजरा करण्याचे धैर्य कुठून आले, असा सवाल करून, शिक्षणाचा विनोद केलेल्या या माणसाने आता असा कार्यक्र म आयोजित करून जनतेच्या दु:खाचाही ‘विनोद’ केल्याचा टोलाही आव्हाड यांनी लगावला.