एमआयडीसीच्या डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात दाेन महिने टॅंकर बंदी

By सुरेश लोखंडे | Published: May 13, 2023 07:52 PM2023-05-13T19:52:42+5:302023-05-13T19:53:27+5:30

ठाणे : जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये रविवारी १४ मेपासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपासून ...

Tanker ban for two months in Dombivli, Ambernath, Badlapur area of MIDC | एमआयडीसीच्या डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात दाेन महिने टॅंकर बंदी

एमआयडीसीच्या डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात दाेन महिने टॅंकर बंदी

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये रविवारी १४ मेपासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला संध्याकाळपासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही डाॅ. परोपकारी यांनी सांगितले.

Web Title: Tanker ban for two months in Dombivli, Ambernath, Badlapur area of MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे