दिव्यातील रस्ता रुंदीकरणावरुन भाजपाचा शिवसेनेवर निशाना, प्रशासनाचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 04:33 PM2018-11-26T16:33:38+5:302018-11-26T16:37:01+5:30
दिव्यातील रस्ता रुंदीकरणाचे प्रकरण आता आणखी तापले आहे. यामध्ये भाजपा विरुध्द शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेवर निशाना साधत भाजपाने प्रशासनावर आगपाखड करीत आधी पुनर्वसन करा, मगच रुंदीकरण करा असा नारा दिला आहे.
ठाणे - दिवा स्टेशन रोड रस्त्याच्या रु दीकरणात बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवासी व व्यापाऱ्यांना नोटिसा न देता इमारत खाली करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या धोरणावरून भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर रहिवाशांच्या आडून निशाणा साधला आहे. यानुसार रविवारी घेतलेल्या एका निर्धार सभेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आधी पुनर्वसन आणि नंतरच रास्ता रु ंदीकरण अशी आक्रमक भूमिका घेऊन दडपशाही पद्धतीने कारवाई करणाºया मनपा प्रशासनाचा निषेध करून रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल, इशारा देऊन शिवसेनेला टार्गेट केले.
या सभेला भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड व दिवा विभाग अध्यक्ष अॅड.आदेश भगत, कागती युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन पाटील, सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी उपस्थित बाधित रहिवासी व व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष निलेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
*शिवसेना नगरसेवकावर आरोप
आगासन रस्ता जंक्शन ते दिवा पूर्व स्टेशन येथील रस्त्याचे ६० मीटर रु ंदीकरणाचा व रस्ता बांधणीचा ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर झाला असून महापालिकेने सर्व इमारती खाली करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना याची कोणतीही लेखी सूचना आजतागायत दिलेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशांना अंधारात ठेऊन व पुनर्वसनाची कोणतीही लेखी हमी न देता मनपा अधिकारी हे रुंदीकरण करण्याच्या हेतूने काम करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून जबरदस्तीने इमारत खाली करण्यासाठी गरीब रहिवाशांवर दबाव निर्माण केला जात आहे. अधिकारी वर्ग व नगरसेवक कोणत्याही वेळी इमारतीत येऊन इमारत खाली करा म्हणून रहिवाशांना धमकावत आहेत, असे गंभीर आरोप करून भाजपाने रस्ता रुंदीकरणावरून यावेळी शिवसेनेला आरोपीच्या पिंजºयात उभे केले.
* राज्यमंत्री रहिवाशांच्या पाठिशी
बाधित होणाऱ्या रहिवाशांना आणि व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी पुनर्वसनाची लेखी हमी मिळाल्याशिवाय इमारत खाली करणार नाही. दिव्यातील रस्ता रु ंदीकरण बधितांच्या पाठीशी असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तर हा विषय सुरू असलेल्या अधिवेशनात घेणार असल्याचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी सांगितले. त्यामुळे ठाणे महापालिका आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.