शाळांच्या संख्येसह शिक्षकांना करावी लागणारी कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:54+5:302021-07-17T04:29:54+5:30
२) आठवीपर्यंतच्या जि प.च्या शाळा- ८३५ ३) जि.प.चे एकूण शिक्षक - ३७३३ ४) जि.प.चे विद्यार्थी - ७७,८५२ ------------ १) ...
२) आठवीपर्यंतच्या जि प.च्या शाळा- ८३५
३) जि.प.चे एकूण शिक्षक - ३७३३
४) जि.प.चे विद्यार्थी - ७७,८५२
------------
१) शिक्षकांची कामे :
शिक्षकांची कर्तव्य : १) नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . २) निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून '' सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '' (सीसीई ) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे . ३) गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे. ४) व्यापक ''सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '' करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे. ५) पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती. क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे. ६) विविध प्रशिक्षणात सहभागी होणे. ७) परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे. ८) शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे. ९) शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे. १०) सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे. ११) गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे. १२) शालेय दैनंदिन उपक्रम, सह शालेय उपक्रम यात सक्रिय सहभाग नोंदवणे . १३) कृतिशील अध्ययन, ज्ञान रचनावाद, बालस्नेही, बालाकेंद्रित वातावरण, स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणे. १४) शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत , निर्मल ग्राम योजना, संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई . योजनांची माहिती ठेऊन गरजेनुसार सक्रिय सहभाग नोंदविणे. १५) सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे. १६) बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे १७) शाळेतील उपलब्ध साधनसामग्रीचा अध्ययन, अध्यापनात नियमित वापर करणे. उदा . संगणक, टी. व्ही., गणित पेटी, विज्ञान पेटी, नकाशे, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य , स्वयं-अध्ययन कार्ड , विविध चार्टस , मॉडेल्स इत्यादी १८) वर्गाशी, शाळेशी निगडित सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे. १९) मुख्याधापक, अधिकारी यांच्या लेखी, तोंडी सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे पार पाडणे. २०) आरटीई - २००९, व आरटीई- २०११ या कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करणे आदी.
-------------
२) शिक्षक व संघटना म्हणून शिकवण्याशिवाय काय-काय कामे करावी लागतात-
अ) खिचडी शिजवून घेणे व मुलांना वाटप करणे
आ) ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका पार पाडणे.
ब) आधारकार्ड तयार करणे
क) शाळेची डागडुजी, रंगकाम
ड) दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी तयार करणे
इ) विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे.
ई) वेगळ्या जयंत्या, विशेष दिन साजरे करून त्यांचे अहवाल लिहिणे.
उ) वर्षभर मतदार नोंदणी करणे (बीएलओ)
ऊ) जंतनाशक,लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व अहवाल पाठवणे.
ए) रोजकीर्द, खतावणी लिहिणे, बँकेचे व्यवहार पाहणे.
ओ) माध्यान्ह भोजन योजनेचा हिशोब ठेवणे.
औ) हागणदारीमुक्त मोहीम राबविणे.
क) वर्षभरात वीस पेक्षा जास्त रजिस्टर लिहिणे.
ख) विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती ऑनलाईन भरणे.
ग) सरल वर विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती तसेच वेगवेगळ्या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे.
------