१७ कोटींची करवसुली

By admin | Published: April 5, 2016 01:19 AM2016-04-05T01:19:53+5:302016-04-05T01:19:53+5:30

अंबरनाथ नगरपरिषदेने मार्चअखेरपर्यंत ९५ टक्के करवसुली केली आहे. त्यातून १६ कोटी ९२ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे.

Taxes of 17 crores | १७ कोटींची करवसुली

१७ कोटींची करवसुली

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेने मार्चअखेरपर्यंत ९५ टक्के करवसुली केली आहे. त्यातून १६ कोटी ९२ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. आतापर्यंत नगरपरिषदेने ही सर्वाधिक करवसुली केली आहे.
शहरातील ७६ हजार नागरिक तर औद्योगिक क्षेत्रातील एक हजार ७५ जण कर भरतात. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक नरेंद्र संख्ये, निरीक्षक प्रशांत राणे, अमोल मानकर, प्रमोद पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून ही करवसुली केली आहे. करवसुलीसाठी नागरिकांना आवाहन करण्यापासून प्रत्येक घरोघरी कामगारांमार्फत कर भरण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनीही जागृत होऊन वेळेत कर भरले आहे. भविष्यात कराची रक्कम वाढावी, यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदने मागील वर्षभरापासून शहरातील सर्व मालमत्तांची फेरमोजणी सुरू केली आहे. त्यामुळे वाढीव बांधकाम व इतर बांधकामेही या मोजणीत समाविष्ट झाल्यावर २०१६-१७ मध्ये हीच करवसुली २५ कोटींच्या वर जाणार आहे, असे संख्ये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Taxes of 17 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.