‘आंतरराष्ट्रीय आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्डने’ टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील सन्मानीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:10 PM2019-07-07T16:10:15+5:302019-07-07T16:18:52+5:30

सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये टीडीसीसी बॅकेला आघाडीवर ठेवून १५९ कोटी ६३ लाखांचा ढोबळ नफा पाटील यांनी कौशल्यपूर्ण कामगिरीने प्राप्त करून दिला. एवढेच नव्हे तर बँकेत सहा हजार ९७८ कोटी १५ लाखांच्या ठेवी, चार हजार ५३९ कोटी २३ लाखांची गुंतवणूक, तीन हजार १३ कोटी २८ लाखाचे कर्ज वाटप, आणि आठ हजार ३१४ कोटी ९१ लाखांचे खेळते भांडवल बँकेत ठेवून पाटील यांचे कामकाज सर्वोत्कृष्ठ ठरले आहे

TDCC Bank President Rajendra Patil honored by the International Economic Relatives Award | ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्डने’ टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील सन्मानीत !

दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांना ‘आंतरराष्ट्रीय  आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ या पुरस्काराने मास्को येथील कार्यक्रमात नुकतेच सन्मानीत केले

Next
ठळक मुद्देरशियाची राजधानी मास्को येथे आंतरराष्ट्रीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानीतसर्वोत्कृष्ट कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरचार हजार ५३९ कोटी २३ लाखांची गुंतवणूक, तीन हजार १३ कोटी २८ लाखाचे कर्ज वाटप,

ठाणे : राज्यभरातील सहकारी बँकांपैकी एकमेव १५९.६३ कोटींचा ढोबळ नफा मिळवून सामाजिक विकासात आघाडीवर असणाऱ्या दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांना ‘आंतरराष्ट्रीय  आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ या पुरस्काराने मास्को येथील कार्यक्रमात नुकतेच सन्मानीत केले आहे.
रशियाची राजधानी मास्को येथे जम्मू काश्मिरचे माजी मंत्री झुल्फीकार अली चौधरी, ताश्कंद येथील ‘एनआयएचए’ विद्यापीठाचे डीन डॉ. ए.आर. नासीर, आंतरराष्ट्रीय आयटी सेलचे मुख्य सुशिलकुमार चर्तुवेदी, मास्कोच्या बिझनेस अलाईड्सचे अध्यक्ष सॅमी कोटवानी, मास्कोच्या आयुर्वेदीक अ‍ॅन्ड मेडिकल कॉलेजच्या मिसेस मारिया आदी आंतरराष्ट्रीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ पाटील यांना सन्मानपूर्वक २९ जून रोजी बहाल करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भगिरथ भोईर उपस्थित होते. सहकारी बँकांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य व सामाजिक पातळीवरील विकासात्मक सर्वोत्कृष्ट कामकाज टीडीसीसी बँकेच्या माध्यमातून पाटील यांनी केली. या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन त्यांना मानाच्या आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ ने सन्मानीत केले आहे.
टीडीसीसी बँकेला कृषी क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आदींसह राज्यभरातील सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये टीडीसीसी बॅकेला आघाडीवर ठेवून १५९ कोटी ६३ लाखांचा ढोबळ नफा पाटील यांनी कौशल्यपूर्ण कामगिरीने प्राप्त करून दिला. एवढेच नव्हे तर बँकेत सहा हजार ९७८ कोटी १५ लाखांच्या ठेवी, चार हजार ५३९ कोटी २३ लाखांची गुंतवणूक, तीन हजार १३ कोटी २८ लाखाचे कर्ज वाटप, आणि आठ हजार ३१४ कोटी ९१ लाखांचे खेळते भांडवल बँकेत ठेवून पाटील यांचे कामकाज सर्वोत्कृष्ठ ठरले आहे. एवढेच नव्हे तर बँकेचा एनपीए शुन्य टक्के आणि सीआएआर १२.४६ टक्के आहे. बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होऊन पाटील यांनी अल्पावधीत सर्वोत्कृष्ट कामकाज केल्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन त्यांना ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनीक आॅचिव्हर्स अ‍ॅवार्ड’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत केल्यामुळे त्यांचे देशभरातील व राज्यातील सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Web Title: TDCC Bank President Rajendra Patil honored by the International Economic Relatives Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.