टीडीसीसी बँकेकडून शिक्षक पत्नीस ३० लाखांच्या अपघात विम्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:03+5:302021-09-24T04:47:03+5:30
ठाणे : येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने शिक्षकांसाठी अपघात विमा लागू केलेला आहे. त्यास अनुसरून बँकेचे अध्यक्ष ...
ठाणे : येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने शिक्षकांसाठी अपघात विमा लागू केलेला आहे. त्यास अनुसरून बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, सीईओ राजेंद्र दोंदे आदींच्या हस्ते नुकतेच अपघाती निधन झालेले भिवंडीचे शिक्षक सतीश पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व कन्या उन्नती यांना ३० लाखांचा अपघात विम्याचा धनादेश गुरुवारी सुपुर्द करण्यात आला आहे.
बँकेच्या सभागृहात या अपघात विम्याचा धनादेश वितरण समारंभ गुरुवारी पार पडला. यावेळी सभागृहात बँकेच्या सर्व संचालकांसह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भिवंडी येथील प.रा. विद्यालयात पवार कार्यरत होते. त्यांचे ३१ मे रोजी शिक्षक पवार यांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या विमा रकमेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले. त्यास अनुसरून यावेळी राज्य शिक्षण क्रांतीचे अध्यक्ष सुधीर घागस, भाजप शिक्षक मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप कालेकर, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-