अंगणवाडी सेविकांना आधी शिकवा इंग्रजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:43+5:302021-07-31T04:40:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात आणि गावखेड्यांत अंगणवाडी सेविका या गावखेडे आणि ‌शासनामध्ये दुवा साधण्याचे ...

Teach English to Anganwadi workers first | अंगणवाडी सेविकांना आधी शिकवा इंग्रजी

अंगणवाडी सेविकांना आधी शिकवा इंग्रजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात आणि गावखेड्यांत अंगणवाडी सेविका या गावखेडे आणि ‌शासनामध्ये दुवा साधण्याचे महत्त्वाचे ‌काम करीत आहेत. या सेविकांच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना गावांतील संबंधित व्यक्तींशी संपर्क करणे शक्य होत आहे. शासनाच्या विविध योजना सेविकांमुळे गावखेड्यांत राबविणे शक्य झाले आहे. याकमी शिकलेल्या महिला गाव परिसरात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. शिक्षण कमी असूनही त्यांच्याकडून इंग्रजीत ऑनलाईन माहिती भरून घेतली जात आहे.

गावातील जन्म आणि मृत्यू नोंदीसह मातांना नियोजन करण्यास सक्षम करण्यासाठी घरी भेटी देणे, तसेच मुलाच्या वाढीत आणि विकासात प्रभावी भूमिका पार पाडण्याची भूमिका या सेविका पार पाडत आहेत. त्यांच्याकडून नवजात मुलांवर जास्त भर दिला जात आहे. यासंबंधी तयार केलेल्या विविध फायली आणि नोंदी राखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी या सेविका आघाडीवर आहेत. गावांमधील लसीकरण, आरोग्य तपासणी, जन्मपूर्व आणि जन्मानंतरच्या तपासण्या आदी कामे या कमी शिकलेल्या महिलांकडून करून घेतली जातात. त्याबदल्यात त्यांना अल्प मानधन दिले जात आहे.

..........

पोषण ट्रॅकवरील कामे

‌महिन्याला प्रत्येक मुलाचे वजन करण्यासाठी त्याच्या वाढीच्या कार्डावर वजनाचे ग्राफिक रेकॉर्डिंग करणे. माता, मुलांच्या प्रकरणांना उपकेंद्र, पीएच.डी. इत्यादीकडे संदर्भित करण्यासाठी रेफरल कार्ड वापरणे, सहा वर्षांखालील मुलांसाठी मुलांचे कार्ड सांभाळणे, वैद्यकीय आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना भेट देणे, सर्व कुटुंबांचे, विशेषत: त्या कुटुंबातील माता आणि मुलांचे आपापल्या कार्यक्षेत्रातील वर्षातून एकदा सर्वेक्षण करणे, मुलांच्या अंगणवाडीत पूर्वऔपचारिक उपक्रमांचे आयोजन करणे, अंगणवाडीमध्ये वापरण्यासाठी देशी मूळची खेळणी बनवण्यास मदत करणे. मुलांसाठी पूरक पोषण आहार आयोजित करणे, स्थानिक पातळीवर आधारित मेनूचे नियोजन करून गर्भवती आणि नर्सिंग मातांसाठी स्थानिक पाककृती उपलब्ध करणे, मातांना आरोग्य आणि पोषण शिक्षण आणि स्तनपान, अर्भक आणि तरुण आहार पद्धतींवर समुपदेशन प्रदान करणे, अंगणवाडी कामगार स्थानिक समुदायाशी जवळचे असल्याने विवाहित महिलांना कौटुंबिक नियोजन, जन्म नियंत्रण उपायांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे.

-------

पूरक जोड आहे

--------------

प्रतिक्रिया पाठवतोय....

५) आम्हाला इंग्रजी कशी येणार-

६) सीईओ प्रतिक्रिया-

Web Title: Teach English to Anganwadi workers first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.