आगरी साहित्य पुरस्काराने शिक्षक श्याम माळी सन्मानीत

By सुरेश लोखंडे | Published: December 22, 2023 05:39 PM2023-12-22T17:39:11+5:302023-12-22T17:39:32+5:30

हा पुरस्कार आगरी साहीत्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे.            

Teacher Shyam Mali honored with Agri Literary Award | आगरी साहित्य पुरस्काराने शिक्षक श्याम माळी सन्मानीत

आगरी साहित्य पुरस्काराने शिक्षक श्याम माळी सन्मानीत


ठाणे : आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवली येथे आयोजित १९ व्या आखील भारतीय आगरी महोत्सवात शिक्षक श्याम माळी यांच्या "आगरवाट" या आगरी बोलीभाषेतील कवितासंग्रहास "स्व. नकुल पाटील स्मृती राज्यस्तरीय आगरी साहित्य पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार आगरी साहीत्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे.            

श्रीसंत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली या ठिकाणी हा सोहळा पार पडला. या साेहळ्यात सन्मानपूर्वक प्राप्त झालेल्या या पुरस्कारात सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व दहा हजार एक रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी कवी गीतकार गायक दया नाईक, साहित्यिक मोहन भोईर, गजआनन म्हात्रे, प्रकाश पाटील (वसई), दशरथ मुकादम यांनादेखील स्व. नकुल पाटील स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रसंगी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, सुरेश देशपांडे, दिपाली केळकर, आगरी महोत्सव कमिटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, रामकृष्ण पाटील, भानुदास भोईर, व सर्व कमिटी सदस्य तसेच गायक किसन फुलोरे, कवी संदेश भोईर उपस्थित होते.
 

Web Title: Teacher Shyam Mali honored with Agri Literary Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.