उल्हासनगरात कोरोनाचे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना संसर्गाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:32 PM2020-07-07T16:32:58+5:302020-07-07T16:33:07+5:30
उल्हासनगरात कोरोनाची संख्या ३ हजार पेक्षा जास्त झाली असून पीपीई किट्स विना घरोघरी सर्वेक्षण करणे धोकादायक झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने घरोघरी जावून सर्वेक्षण करण्या करीता पालिका व खाजगी अनुदानीत शाळेतील २०० पेक्षा जास्त शिक्षकांना कामाला जुंपले आहे. सर्वेक्षण वेळी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली असून दोन शिक्षकांना संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगरात कोरोनाची संख्या ३ हजार पेक्षा जास्त झाली असून पीपीई किट्स विना घरोघरी सर्वेक्षण करणे धोकादायक झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली. भिवंडी येथील टाटा आमंत्रण येथील इमारती मध्ये ४०० पेक्षा जास्त संशयित रुग्णांना क्वारंटाईन केले आहे. त्या ठिकाणी काही शिक्षकांना कार्यरत केले. या दरम्यान संसर्ग होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली. घरोघरी सर्वेक्षण करतेवेळी, महापालिका पुरेशी सुखसुविधा देत नसून आम्हच्या मूळे कुटुंबाचे जीवन धोक्यात आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. महापालिका आरोग्य केंद्र -१ च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन शिक्षिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांना स्वाब अहवाल येणे बाकी असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी दिली.
महापालिका व इतर शासकीय विभागाचा कर्मचारी वर्ग लॉकडाऊन मूळे गेल्या अनेक महिन्यांपासून घरी आहे. त्यांना अश्या कामांना महापालिका का जुंपत नाही?. असा प्रश्न शिक्षकांनी केला. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकातून मुलांना संसर्ग होण्याची भीती असून महामारी दरम्यान घरोघरी सर्वेक्षण करण्याचे कोणतेही प्रशिक्षण न देता. शिक्षकांना कामाला कुंपणे धोकादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त करा. असा राज्य शासनाचा आदेश आला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना माहिती दिली असून पर्यायी कर्मचारी वर्ग ऊपलब्ध होताच शिक्षकांना कामातून मुक्त केले जाणार आहे.
सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना कोरोना
महापालिका व खाजगी अनुदानित शाळेतील २०० पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केले. सर्वेक्षण करताना संसर्ग होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान महापालिका आरोग्य केंद्र क्र-१ मधील दोन शिक्षिकांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली. मात्र आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन सविस्तर माहिती देतो. अशी प्रतिक्रिया पालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.