ई-लर्निंग साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:19+5:302021-09-22T04:44:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वासिंद : ई-लर्निंग साहित्य निर्मितीसाठी शहापूर तालुका गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षकांची कार्यशाळा घेतली. शहापूर तालुक्यातील ...

Teacher's workshop for e-learning material production | ई-लर्निंग साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांची कार्यशाळा

ई-लर्निंग साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांची कार्यशाळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वासिंद : ई-लर्निंग साहित्य निर्मितीसाठी शहापूर तालुका गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षकांची कार्यशाळा घेतली.

शहापूर तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास अधिकाधिक होण्यासाठी तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने ई-लर्निंगबाबतचे नियोजन तालुकास्तरीय कार्यशाळेत करण्यात आले. त्यातून इयत्ता पहिली ते आठवीच्या इयत्तानिहाय सर्व विषयांच्या पाठ्यक्रमांस पूरक असे वेगवेगळे ई-साहित्य संकलित अथवा नवीन तयार करण्याचा मानस आहे. तर, यामध्ये शैक्षणिक व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स, पीपीटी, चित्रे, फोटो, ऑनलाइन लिंक यांसारख्या इतर काही शैक्षणिक ई-साधनांचा समावेश असून, यामुळे दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत या साधनांचा उपयोग होईल व शाळांवर असलेल्या डिजिटल साधनांचा वापरही अधिकतेने होणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

या उपक्रमात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिकाधिक दर्जेदार व परिणामकारक करणे, शाळेतील डिजिटल साधनांचे उपयोगितामूल्य वाढविणे, शिक्षक व विद्यार्थी यांना अधिकाधिक तंत्रस्नेही बनविणे, संकल्पना स्पष्टीकरण व दृढ करण्यासाठी डिजिटल साहित्याचा वापर करणे, दुसऱ्या कंपनीचे ई-सिलॅबस विकत घेण्यापेक्षा स्वतःचे डिजिटल कंटेंट तयार करून त्याचा अध्ययन-अध्यापनात वापर करणे या उद्दिष्टांबरोबरच अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी द्रुक-श्राव्य साधने सर्वाधिक फलदायी असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी, अशा साधनांचा उपयोग होण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

-------------------

Web Title: Teacher's workshop for e-learning material production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.