७२ तास स्केटिंगचा सांघिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:16 AM2018-06-14T04:16:42+5:302018-06-14T04:16:42+5:30

‘खेलो इंडिया खेलो’ उपक्रमांतर्गत बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत सलग ७२ तास स्केटिंग करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आठ ग्रुपने मिळून न थांबता स्केटिंग करत हा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात बदलापूरची मिष्का राठोड हिचा सहभाग होता.

 Team record of skating 72 hours | ७२ तास स्केटिंगचा सांघिक विक्रम

७२ तास स्केटिंगचा सांघिक विक्रम

Next

बदलापूर -  ‘खेलो इंडिया खेलो’ उपक्रमांतर्गत बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत सलग ७२ तास स्केटिंग करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. आठ ग्रुपने मिळून न थांबता स्केटिंग करत हा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमात बदलापूरची मिष्का राठोड हिचा सहभाग होता.
स्केटिंग अ‍ॅकॅडमी आॅफ इंडियाने आपल्या यशस्वी कामगिरीत भर घातली आहे. बेळगाव येथील शिवगंगा आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग ट्रॅकवर ७२ तास विविध खेळांसह न थांबता स्केटिंग करण्याचा विक्रम केला आहे. भारतातून आलेल्या ३७० स्केटर्सने मिळून हा विक्रम नोंदवला आहे. ट्रॅकवर स्केटिंग करण्यासोबत स्केटिंगच्या आतील मैदानावर रोलर स्केटिंग, स्केटिंग फुटबॉल, हॅण्डबॉल, म्युझिकल चेअर, रोलबॉल, खो-खो, कबड्डी यासारखे खेळही खेळले गेले.
सलग ७२ तास हे खेळ आणि स्केटिंग करून अनोखा विक्रम केला गेला. बदलापुरामधील सनराइज स्कूलची विद्यार्थिनी मिष्का हिचा सहभाग होता. आपला सहभाग असल्याचा आनंद तिने व्यक्त केला.

विविध राज्यांतून स्पर्धकांचा सहभाग

हा विक्रम सांघिक असला, तरी त्यात प्रत्येकाच्या विक्रमाची नोंद म्हणून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या विक्रमात महाराष्ट्रासह पुणे, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, बिहार, जयपूर, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा या राज्यांतील स्केटर्स सहभागी झाले होते.

Web Title:  Team record of skating 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.