पुराने झालेले नुकसान पाहून अश्रू आवरेना; स्क्रिप्ट गेल्या वाहून, प्रमाणपत्रांचा झाला लगदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:21 AM2017-09-03T05:21:16+5:302017-09-03T05:21:21+5:30

शेकडो स्क्रिप्ट वाहून गेल्या, स्पर्धांमध्ये पटकावलेली पारितोषिके, प्रमाणपत्रांचा लगदा झाला, वेशभूषा, कॅमेरे, साऊण्ड सिस्टीम, संगणक भिजल्याने निकामी झाले, नेपथ्य, प्रकाशयोजनेची अक्षरश: नासाडी झालेली.

Tears weeping after the loss of old; Done past scripts, certificates get pulp | पुराने झालेले नुकसान पाहून अश्रू आवरेना; स्क्रिप्ट गेल्या वाहून, प्रमाणपत्रांचा झाला लगदा

पुराने झालेले नुकसान पाहून अश्रू आवरेना; स्क्रिप्ट गेल्या वाहून, प्रमाणपत्रांचा झाला लगदा

Next

- प्रज्ञा म्हात्रे ।

ठाणे : शेकडो स्क्रिप्ट वाहून गेल्या, स्पर्धांमध्ये पटकावलेली पारितोषिके, प्रमाणपत्रांचा लगदा झाला, वेशभूषा, कॅमेरे, साऊण्ड सिस्टीम, संगणक भिजल्याने निकामी झाले, नेपथ्य, प्रकाशयोजनेची अक्षरश: नासाडी झालेली. दि. २९ आॅगस्टच्या पुरात सारं काही वाहून गेले, आता उरल्या आहेत त्या फक्त आठवणी, असे सांगताना अभिनय कट्ट्याच्या कलाकारांच्या डोळ््यांतून अश्रूंचा पूर झरु लागला. दर रविवारी ठाणेकरांचे मनोरंजन करणारा व शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा अभिनय कट्टा आता पुन्हा उभा कसा राहणार हा प्रश्न कलाकारांसमोर उभा राहीला आहे.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाची चळवळ असणारा व उगवत्या कलाकारांसाठी गेली सहा वर्षे हक्काचे व्यासपीठ बनलेला ‘अभिनय कट्टा’ संपूर्ण पाण्याखाली गेला. कट्ट्याचे कार्यालय, कट्ट्यावरील सादरीकरणाचा हॉल येथे सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी भरले होते. मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून ते बुधवारी दुपारपर्यंत कट्ट्याचे कलाकार या अस्मानी संकटाचा सामना करीत होते. कोणाचीही मदत न घेता एकमेकांना हात देत कट्टा वाचवण्याकरिता जीवाची पर्वा न करता अतोनात प्रयत्न करीत होते. कट्ट्याची सर्व साधन सामग्री रस्त्यावरुन वाहून गेली. कट्ट्याचे सर्वेसर्वा किरण नाकती, त्यांची पत्नी, मुले, कट्ट्याचे कलाकार यांच्यासह कार्यालयात काम करणारे कर्मचारी देखील जागोजागी पडलेल्या वस्तू वेचत होते. एकेक वस्तू उचलताना त्यांच्या काळजात कालवाकालव होत होती. आम्हाला मिळालेल्या ट्रॉफी, प्रमाणपत्र भिजलेल्या अवस्थेत हातात पडली तेव्हा डोळ््यांत फक्त अश्रू होते, नि:शब्द होऊन आम्ही त्याकडे फक्त पाहत होतो, असे कलाकार मंडळी सांगत होती. पुरानंतर कट्ट्याची झालेली दयनीय परिस्थिती शनिवारी पाहायला मिळाली. झाडाला, दिव्याच्या खांबाला दोºया बांधून कपडेपटातील कपडे, पोस्टर्स सुकवले जात आहेत तर दुसरीकडे खुर्च्या, टेबल मोडून पडले आहे. नुकसान इतके झाले आहे की वस्तू ओळखणे कठीण झाले आहे, असे नाकती यांनी सांगितले. नाट्य परिषदेतर्फे आयोजित केलेल्या अभिनय स्पर्धेत अलीकडेच अभिनय कट्ट्याने बाजी मारली होती. त्यावेळी मिळालेली प्रमाणपत्रे देखील वाहून गेली. कट्ट्याचे काय काय उरले याची यादी जेव्हा करायला घेतली तेव्हा हातात काहीच उरले नाही, असे निदर्शनास आल्याचे सर्व सांगत होते. नाकती यांनी कट्ट्याच्या कलाकारांसाठी वाचनालय तयार केले होते. यात भरपूर पुस्तके, कादंबºया त्यांनी ठेवली होती. ही पुस्तके देखील वाहून गेली आहेत. सर्वसामान्य प्रेक्षक गेल्या दोन दिवसांपासून कट्टयावर येऊन अक्षरश: अश्रू ढाळत आहे, असे नाकती यांनी सांगितले. गतवर्षीही पावसाळ््यात कट्टा दीड ते दोन फूट पाण्यात गेला होता. परंतु त्यावेळी नुकसान फार झाले नव्हते. मंगळवारी पुरामुळे झालेली हानी खूपच मोठी असल्याने लोकचळवळीतून उभा राहिलेला कट्टा पुढे कसा चालवावा, असे प्रश्नचिन्ह उभे राहिला आहे. अभिनय कट्टयाने दिव्यांग मुलांसाठी अलीकडेच केंद्र सुरू केले होते. या केंद्राचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. या दिव्यांग मुलांच्या कलाकौशल्यासाठी आणलेली सामग्री वाहून गेल्याचे केंद्राच्या मुख्याध्यापिका संध्या नाकती म्हणाल्या.

Web Title: Tears weeping after the loss of old; Done past scripts, certificates get pulp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.