महावितरणच्या डोंबिवलीमधील रामनगर फिडरमध्ये तांत्रिक बिघाड, 4 हजार ग्राहकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 10:27 AM2020-07-16T10:27:02+5:302020-07-16T10:27:26+5:30
रामनगर बालभवन जवळील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे केबल फॉल्ट आढळून आला, त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कस्तुरी प्लाझा जवळील फिडर मधून पर्यायी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
डोंबिवली: लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम असताना महावितरणने अखंडित वीज सेवा देण्याचा संकल्प सोडला होता, परंतु डोंबिवली आणि परिसरात त्यांसकल्पत अनेक विकल्प येत असल्याचे निदर्शनास येत आहे. गुरुवारी सकाळपासून पूर्वेकडील वीज पुरवठा खंडीत झाल्याने रामनगर भागातील सुमारे 4 हजार ग्राहकांना त्याचा फटका बसला. सकाळीं7।15 वाजल्यापासून वीज खंडित झाल्याने अनेक सोसायट्यामध्ये पाण्याच्या खालच्या टाकीतून वरती गच्चीतील टाकीत पाणी सोडण्यामध्ये अडथळे आल्याने बहुतांशी गृहिणींचे नियोजन कोलमडले.
महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामनगर बालभवन जवळील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे केबल फॉल्ट आढळून आला, त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कस्तुरी प्लाझा जवळील फिडर मधून पर्यायी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यात काही अडचणी आल्याने सकाळी 9 वाजून 20 मिनिटांपर्यत समस्या सुटू शकली नव्हती. बाजीप्रभू चौकतील फिडर मध्ये देखील ट्रिप होण्याची समस्या आल्याने काही वेळासाठी वीज खंडित झाली होती, 4त्यानंतर काही वेळाने दोन फेज सुरळीत झाले, पण 1 फेज सुरळीत न झाल्याने काही सोसायट्यामध्ये स्टेअरकेस आणि पाण्याच्या पंपासाठी लागणारी वीज खंडित झाल्याने महावितरणच्या ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.