उल्हासनगरात उद्धाटनापूर्वी तहसिल कार्यालय इमारतीला तडे?; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By सदानंद नाईक | Published: November 11, 2022 05:47 PM2022-11-11T17:47:34+5:302022-11-11T17:47:47+5:30
प्रशासकीय इमारतीची दुरावस्था बघून समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे इमारतीच्या दुरावस्था बाबत साकडे घातले.
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील तहसिल कार्यालय शेजारी बांधकाम विभागाने प्रशासकीय इमारत बांधली असून याठिकाणी अनेक विभागाचे कार्यालय सुरू होणार आहे. मात्र उदघाटनापूर्वीच प्रशासकीय इमारती मध्ये तहसील कार्यालय सुरू करण्यात आले असून ४ वर्षात इमारतीला गळती, खिडक्या जंगणे, लागून भिंतीला तडे गेल्याचे उघड झाले.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील तहसील कार्यालय शेजारी व कॅम्प नं-३ पवई चौक येथील प्रांत कार्यालय शेजारी प्रशासकीय इमारत उभ्या राहिल्या आहेत. पवई चौक प्रांत कार्यालय शेजारील प्रशासकीय इमारत मध्ये सहायक पोलिस आयुक्त कार्यालय, प्रांत कार्यालयसह इतर शासकीय कार्यालये सुरू होणार आहेत. तर तहसील कार्यालया शेजारील प्रशासकीय इमारत मध्ये वजन मापे कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, शिधा वाटप कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग आदी शासकीय कार्यालय सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधींचा निधीतून उभारलेल्या दोन्ही प्रशासकीय इमारती गेल्या ४ वर्षांपासून उदघटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी तहसील कार्यालय शेजारील प्रशासकीय इमारती गेली दोन वर्षे कोरोना आरोग्य केंद्र म्हणून महापालिकेने वापरली आहे.
यादरम्यान इमारतीच्या लोखंडी खिडक्या पूर्णतः गंजल्या असून भिंतीला तडे गेले आहेत. प्रशासकीय इमारतीची दुरावस्था बघून समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे इमारतीच्या दुरावस्था बाबत साकडे घातले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ मिळत नसल्याने, दोन्ही प्रशासकीय इमारतीसह महापालिकेने अंटेलिया येथे उभारलेले २०० बेडचे रुग्णालयाचे उद्घाटन अभावी पडून आहेत. नोव्हेंबर महिन्यात महापालिका रुग्णालयसह अग्निशमन विभागाच्या गाड्या, प्रांत कार्यालया शेजारील प्रशासकीय इमारत यांचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नोव्हेम्बर महिन्यात होणार आहेत. अशी चर्चा शहरात सुरू झाली. मात्र कॅम्प नं-५ तहसील कार्यालय शेजारील प्रशासकीय इमारतीला उडघटनापूर्वीच तडे जाऊन गळती लागल्याने, संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी चंदनशिवे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना होत आहे.