तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आता बेमुदत काम बंद आंदाेलन

By सुरेश लोखंडे | Published: March 30, 2023 07:14 PM2023-03-30T19:14:05+5:302023-03-30T19:16:50+5:30

३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदाेलन छेडण्याच्या तयारीत

Tehsildar, Naib Tehsildars now stop work indefinitely in Thane | तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आता बेमुदत काम बंद आंदाेलन

तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आता बेमुदत काम बंद आंदाेलन

googlenewsNext

सुरेश लोखंडे, ठाणे: महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदाेलन छेडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कार्मचार्यांच्या पाठाेपाठ आता तहसीलदारही संपावर जात असल्यामुळे नागरिकांचे हाल हाेणार असल्याचे बाेलले जात आहे. नायब तहसिलदार (राजपत्रित) वर्ग-२ पदाची वेतन श्रेणी व ग्रेड पे - चार हजार ८०० करण्याची मागणी हाेत आहे. दर्जा वर्ग - २ मग वेतनश्रेणी वर्ग-३ ची का? असे या नायब तहसीलदारांमध्ये बाेलले जात आहे. सातत्याने शेतकरी, कष्टकरी, वंचित, मजूर, महिला व जेष्ठ नागरिक यांचे हितसाठी महसूल विभाग सतत कार्यरत आहे.

तहसीलदार व नायब तहसिलदार संघटनेने यापूर्वी १९९८ पासून वारंवार नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग - २ यांना इतर समकक्ष वर्ग - २ पदाची वेतनश्रेणी लागू करावी यासाठी निवेदन दिले आहे. प्रत्यक्ष भेटी घेवून भूमिका मांडणे, सादरीकरण करुनही जाणिवपूर्वक संघटनेच्या न्याय मागणीकडे दूर्लक्ष केल्याचा आराेप केला जात आहे. त्यामुळे आता बेमुदत कामबंद करण्याचा निर्णय घेऊन या अधिकार्यांनी घेतला आहे.

Web Title: Tehsildar, Naib Tehsildars now stop work indefinitely in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप