खातीवलीच्या सुर्ष्टी फार्म हाऊसवर तहसीलदारांची कारवाई, ठोठावला 50 हजारचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 17:33 IST2021-03-29T17:32:19+5:302021-03-29T17:33:11+5:30
Tehsildar takes action against Khatiwali's Surshti Farm House : शासन निर्णयानुसार, सुर्ष्टी फार्म हाऊस खातीवलीच्या मालकास शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी 50 हजाराचा दंड ठोठावला असून पुढच्या वेळी नियम बाह्य काम केल्यास फार्महाऊस सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

खातीवलीच्या सुर्ष्टी फार्म हाऊसवर तहसीलदारांची कारवाई, ठोठावला 50 हजारचा दंड
- शाम धुमाळ
कसारा : राज्यात कोरोनाने पुनःश्च डोके वर काढले असल्याने राज्य शासनाने हॉटेल, रिसॉर्ट, विवाह कार्यालय, धार्मिक स्थळ या ठिकाणासाह सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. ठिकठिकाणी नियम लागू करीत, नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईचे आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत. (Tehsildar takes action against Khatiwali's Surshti Farm House, fined Rs 50,000)
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहापूर तालुक्यातील खातीवली वाशिंद येथील व भातसा नदी पात्रा लगत असलेल्या सुर्ष्टी फार्म हाऊसवर शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.
खातीवली येथील सुर्ष्टी फार्म हाऊसवर सुरु असलेल्या होळी पार्टीत शासनाचे नियम पायदळी तुडवत विना मास्क, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत शंभरहुन अधिक लोकांनी गर्दी केली होती. पार्टी साठी आलेल्या गर्दीत मोठया प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांची पायमली होत असल्याचे निदर्शनात आल्यावर ही कारवाई करण्यात आली.
शासन निर्णयानुसार, सुर्ष्टी फार्म हाऊस खातीवलीच्या मालकास शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी 50 हजाराचा दंड ठोठावला असून पुढच्या वेळी नियम बाह्य काम केल्यास फार्महाऊस सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाई पथकात, नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, तलाठी रुपेश मेरठ, मिलिंद राऊत सहभागी झाले होते. दरम्यान तहसीलदारांच्या धडक कारवाईमुळे हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस, चालकांचे धाबे दणाणले आहेत.
शहापूर तालुक्यातील हॉटेल, रिसॉर्ट, दुकानदारयांनी राज्य शासनाचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे जाणसामान्यांनी देखील मास्क चा वापर करून गर्दी करणे टाळावे, दरम्यान नियम तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- निलिमा सूर्यवंशी
तहसीलदार, शहापूर