‘तेजस्विनी’ अद्याप पुरुषांच्याच हाती, ठामपा परिवहन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:48 AM2020-02-01T00:48:54+5:302020-02-01T00:49:04+5:30

टीएमटीच्या ताफ्यात एकूण ३५३ बस आहेत. त्यापैकी दररोज २८० बसगाड्या शहरातील विविध मार्गांवर धावतात.

'Tejaswini' is still in the hands of men, the Pandama Transport Committee | ‘तेजस्विनी’ अद्याप पुरुषांच्याच हाती, ठामपा परिवहन समिती

‘तेजस्विनी’ अद्याप पुरुषांच्याच हाती, ठामपा परिवहन समिती

Next

ठाणे : महिलांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने टीएमटीच्या ताफ्यात तेजस्विनी बस दाखल झाल्या. मात्र, प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे लेडिज स्पेशल तेजस्विनी बसचे स्टेअरिंग आणि तिकीटबॅग अद्यापही पुरु षांच्याच हातात आहे. महिलांच्या सोयीकरिता या तेजस्विनीचा कारभार ‘ती’च्या हाती देण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या जाचक अटी, बोटचेप्या नियमावलीमुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या ‘ती’चा हिरमोड झाला आहे. हा सावळागोंधळ परिवहनच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी चव्हाट्यावर आणला असून, तेजस्विनी बसेसवर महिला चालक आणि वाहकांची नेमणूक करण्याचे आदेश परिवहन सभापतींनी दिले आहेत.
टीएमटीच्या ताफ्यात एकूण ३५३ बस आहेत. त्यापैकी दररोज २८० बसगाड्या शहरातील विविध मार्गांवर धावतात. त्यामध्ये वातानुकूलित २३ बसचा समावेश आहे. ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अवघ्या काही दिवसांपूर्वी १० तेजस्विनी बसगाड्या सेवेत दाखल झाल्या.
गर्दीच्या वेळेत सकाळ व संध्याकाळ महिलांसाठी, तर दुपारच्या वेळेत सर्वांसाठी या बस चालवण्यात येतात. नियमानुसार तेजस्विनी बसवर महिला चालक व वाहक देणे बंधनकारक आहे. मात्र, परिवहन प्रशासनाने तेजस्विनीवर पुरु ष चालक व वाहक दिले आहेत. याप्रकरणी परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अशा पद्धतीने तेजस्विनी बस चालवल्यास या योजनेचा मूळ हेतू सफल होत नसल्याचा मुद्दा पायरे यांनी मांडला.
तब्बल २० तेजस्विनी बस आनंदनगर आगारात धूळखात पडल्या आहेत. या बस मार्गावर चालवाव्यात, हा मुद्दा सदस्य दशरथ यादव यांनी मांडला. ठाणे-बोरिवली मार्गावर धावणाºया टीएमटी बसच्या दुरवस्थेबाबत सदस्य राजेश मोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

शैक्षणिक अर्हतेमुळे महिला वाहकांच्या नियुक्तीला ब्रेक
आरटीओकडून सातवी पास महिलांना बॅज देण्यात येतात. त्याआधारे त्यांची भरती करावी, असा मुद्दा प्रभारी परिवहन समिती सभापती राजेंद्र महाडिक यांनी मांडला.
मात्र, या महिला किमान दहावी पास असाव्यात, हा मुद्दा प्रशासनाने उपस्थित करून नियुक्त्यांना ब्रेक लावल्याचे सर्वसाधारण सभेत समोर आले.
त्यामुळे आता आरटीओच्या निकषांप्रमाणेच महिलांची भरती प्रक्रि या पूर्ण करावी. त्यांना नोकरीपासून वंचित ठेवू नका, असे परिवहनचे पदसिद्ध सदस्य, स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी अधिकाºयांना बजावले.

Web Title: 'Tejaswini' is still in the hands of men, the Pandama Transport Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे