टेम्प्लेट- ९२२-...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:37+5:302021-07-16T04:27:37+5:30
टेम्प्लेट- ९२२-... वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर ! सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात ...
टेम्प्लेट- ९२२-...
वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर !
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात पाऊस वाढला असून, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह सरी कोसळत आहेत. त्यामुळे वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत वीज पडून तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी विजा कडकडत असताना आपल्या जवळील मोबाईल तातडीने बंद करावा. तसेच झाडाखाली किंवा इमारतीच्या आडोशाला न थांबता मोकळ्या जागेत थांबावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शहापूरमध्ये चार वर्षांत आतापर्यंत सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला. तसेच भिवंडी तालुक्यात एक, अंबरनाथमध्ये दोन, मुरबाडला तीन मृत्यू झाले आहेत. पाऊस पडत असताना थोडी सावधानता बाळगल्यास या घटनांपासून बचाव करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वीज कडकडण्याच्या वेळी उंच झाडे, इमारती, विजेचे खांब आदींपासून लांब जावे. शक्यतो उभे न राहता उकिवडे बसून डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये घेण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.
जिल्ह्यातील वीज पडण्याच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी वीज प्रतिबंधक उपकरणे बसवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सध्या दोन ठिकाणी वीज प्रतिबंधक यंत्रे बसवली आहेत. त्यात वाढ करून ४८ ठिकाणी वीज प्रतिबंधक यंत्रे बसवणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी म्हणजे बसस्थानक, सार्वजनिक सभागृह, चौक, मैदाने आदी ठिकाणी यंत्रे बसवण्यास प्राधान्य दिले आहे.
------
१) वीज पडल्याने झालेले मृत्यू
वर्ष मनुष्यबळी
२०१७- १८ - ६ ,
२०१८- १९ - १,
२०१९- २० - ३,
२०२०-२१ - ४
२०२१- २२ (१५ जुलैपर्यंत)- १
-------पूरक जोड आहे....
..........
वाचली